शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पाण्याचा वारेमाप उपसा पर्यावरण संतुलनासाठी घातक - हरिदास ताठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 13:34 IST

Excavation of water : पर्यावरण संतुलनासाठी घातक असल्याचा इशारा मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी दिला.

अकोला : भूगर्भात असलेले ३० टक्के पाणी हे हजाराे वर्षांपासून जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा आहे. पाणी जमिनीत मुरण्याचा कालावधी हा १०० ते एक हजार वर्षापर्यंत एवढा माेठा आहे. आपण मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या पाण्याचा वारेमाप उपसा करत आहाेत. हे पर्यावरण संतुलनासाठी घातक असल्याचा इशारा मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोप पार पडला. यावेळी ते बाेलत हाेते मंचावर जिल्हाधिकारी निमा अराेरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.खु.वसुलकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. चव्हाण, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे, जलसंपदा विभागाच्या श्रीमती महाजन, प्रीती शेंडे आदी उपस्थित होते. ताठे म्हणाले की, जगाचा ७० टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे त्यापैकी ९७ टक्के पाणी हे समुद्राचे आहे. केवळ ३ टक्केच पाणी जमिनीवर आहे. या ३ टक्क्यांच्या ६९ टक्के पाणी हे बर्फाच्या स्वरूपात असून ३० टक्के पाणी हे भूगर्भात आहे. केवळ १ टक्केच पाणी तलाव, विहिरी व मानवनिर्मित धरणांमध्ये आहे. अशा स्थितीत तब्बल एक ते दाेन हजार फुट खाेल जाऊन पाण्याचा उपसा करण्याचा प्रकार हा अतिशय घातक असल्याचा इशारा त्यांनी दिला.पाण्याचे साठे मर्यादित असून त्यांचा वापर योग्य व काटकसरीणे करणे आवश्यक आहे. जनसामान्यात जनजागृती निर्माण व्हावे याकरिता जलजागृती सप्ताह राबविला जातो. त्याअनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात चित्ररथाव्दारे जनजागृती, पाणी बचतीबाबत चर्चा सत्र, विद्यालयात विद्यार्थ्यांना जलजागृतीबाबत संबोधन, वॉटर रन, रांगोळी व निबंध स्पर्धेव्दारे जलजागृती करण्यात आली, अशी माहिती अ.खु. वसुलकर यांनी प्रास्ताविकातून दिली. जलजागृती सप्ताहात निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सामूहिक जलप्रतिज्ञा झाली. तर हास्यकवी प्रशांत भोंडे यांनी कवितेच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपिका गावंडे यांनी केले.