शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

‘त्या’ अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:25 IST

अकोला : मराठी शाळांमधील माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर आता अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांच्या समायोजनाची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणारे शिक्षक, त्यांचे विषय, आरक्षण आणि शाळेतील रिक्त पदांच्या माहितीचे संकलन सुरू केले आहे. शिक्षण संचालकांकडून सूचना आल्यानंतर लगेच अतिरिक्त शिक्षकांच्या नावांची यादी प्रकाशित करून, त्यांच्या ऑनलाइन समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती  शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. 

ठळक मुद्देअल्पसंख्याक शाळांमधील समायोजनाचे नियोजनशिक्षकांचे आरक्षण, विषयांच्या माहितीचे संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मराठी शाळांमधील माध्यमिक शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर आता अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांच्या समायोजनाची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणारे शिक्षक, त्यांचे विषय, आरक्षण आणि शाळेतील रिक्त पदांच्या माहितीचे संकलन सुरू केले आहे. शिक्षण संचालकांकडून सूचना आल्यानंतर लगेच अतिरिक्त शिक्षकांच्या नावांची यादी प्रकाशित करून, त्यांच्या ऑनलाइन समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती  शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. राज्यभरामध्ये माध्यमिक मराठी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया तात्पुरती थांबवून ठेवण्यात आली होती. मराठी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया आटोपल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हय़ातील अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरू शकणार्‍या शिक्षकांची माहिती मागविली आहे. एक-एक अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची एकूण संख्या, रिक्त पदे, आरक्षण आणि विषयनिहाय शिक्षकांची संख्या आदी माहिती संकलनाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये अल्पसंख्याक शाळांमधील माहितीचे संकलन पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शिक्षकांची यादी तयार करण्यात येईल. ही यादी मान्यतेसाठी पुणे येथील शिक्षक संचालकांकडे पाठविण्यात येईल. तेथून यादीला मान्यता मिळाल्यानंतर शिक्षण विभागामार्फत अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करून, शिक्षकांच्या हरकती मागविण्यात येतील. त्यासाठी शिक्षकांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यानंतर हरकती नोंदविणार्‍या अतिरिक्त शिक्षकांसह संस्थाचालक, मुख्याध्यापकांसमक्ष सुनावणी घेण्यात येईल आणि मग अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. 

असे होईल जिल्हय़ांतर्गत समायोजनअनुदानित खासगी प्राथ., उच्च माध्य. व माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे प्रथमत: खासगी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये समायोजन होईल. अनुदानित खासगी प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये समायोजनासाठी जागा रिक्त नसल्यास अनुदानित खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जि.प., न.पा., न.प., मनपा शाळांवर करण्यात येईल. या ठिकाणीही जागा रिक्त नसल्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अनुदानित खासगी शाळांमध्ये होईल. जिल्हय़ांतर्गत समायोजन झाल्यानंतरही अतिरिक्त शिक्षक शिल्लक असतील, तर त्यांचे १ ते ४ टप्प्यांनुसार विभागांतर्गत समायोजन होईल. सेवाज्येष्ठता आणि विषयाची आवश्यकता लक्षात घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. 

तर वेतन अदा होणार नाही!अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही हे शिक्षक समायोजित ठिकाणी रुजू झाले नाहीत, अशा शिक्षकांना वेतन देऊ नये. अतिरिक्त शिक्षकाला रुजू करून घेण्यास नकार देणार्‍या शाळेचे पदसुद्धा रद्द करून शालार्थ प्रणालीतून काढून टाकण्याचा आदेशही शासनाने दिला आहे. 

सध्या अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची, रिक्त पदांची माहिती मागविणे सुरू आहे. पूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतर, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी