अकोला : प्रधानमंत्री विमा योजना राबविण्यासाठी राज्य शासनाला अकोल्यासह राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये विमा कंपनी मिळाली नव्हती. २0 जुलै रोजी या कंपन्या निश्चित करण्यात आल्या. त्यामुळे शेतकर्यांना विमा काढण्यासाठी देण्यात आलेली ३१ जुलै ही मुदत अतिशय अपुरी ठरत असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी शेतकर्यांकडून होत होती. तिची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री ना. पांडुरंग फुंडकर यांनी मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्र शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव केंद्राने मान्य केला असून, आता १0 ऑगस्टपर्र्यंत पीक विमा काढण्यासाठी मुदत वाढ मिळाली आहे. अकोल्यासह राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये विमा काढण्याची कंपनीची निश्चिती २0 जुलै रोजी करण्यात आली. त्यामुळे त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत शेतकर्यांना पीक विमा काढण्यासाठी मिळणारी मुदत ही अपुरी होती. त्यामुळे ही मुदत २ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. विमा काढण्यासाठी शेतकर्यांना पेरेपत्रक देण्याची अट असल्यामुळे ही सुद्धा मोठी अडचण शेतकर्यांसमोर उभी ठाकली. त्यामुळे महसूल विभागाने पुढाकार घेत स्वयं घोषणापत्र देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता पीक विम्यापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ अतिशय मोलाची ठरणार आहे. विशेष म्हणजे ना. फुंडकर यांनी या संदर्भात ह्यलोकमतह्णने १४ जुलै रोजी प्रकाशित वृत्ताची दखल घेत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती दिली होती
"पीक विम्याला मुदतवाढ देण्याबाबत मी सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका ठेवली. शेतकर्यांसमोर कागदपत्रे गोळा करण्यासाठी येणार्या अडचणी, विमा कंपनीची निश्चिती या सर्व बाबी लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांना माहिती दिली व त्यांच्या माध्यमातून केंद्र शासनासोबत चर्चा केली. मी स्वत: केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी चर्चा झाली असून, शेतकर्यांचे हित लक्षात घेता मुदतवाढ देण्यात आली आहे."- ना. पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री