शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट; तीन घरांना आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 19:17 IST

हिंगणी बु.येथील मंगला शेषराव कोरडे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.

तेल्हारा : तालुक्यातील हिंगणी बु. येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास घरातील गॅस सिलिंडर फुटल्याने स्फोट झाला. यामुळे तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळविले. आगीत घरांमधील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले.हिंगणी बु.येथील मंगला शेषराव कोरडे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे घरातील वस्तूंनी पेट घेतला. घर माती व लाकडाचे (धाब्याचे) असल्याने घराने सुद्धा पेट घेतला. एवढेच नाहीतर शेजारी राहणारे माणिकराव सदाशिव कोरडे व गोपाल विषवनाथ कोरडे यांचीही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. वेळेवर तेल्हारा येथील नगर परिषद अग्निशमन दलाचा बंब पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. मात्र तोपर्यंत मंगला कोरडे यांचे घर पूर्णत: आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. आगीत घरातील नगदी पन्नास हजार व कागदपत्रे जळाली. तसेच शेजारील दोन घरांमधील जीवनाशयक वस्तू व धान्य जळाले. घरांना मोठी झळ पोहचल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत तहसीलदारांना सरपंच हरिदास वाघ यांनी आग लागल्याची माहिती दिली.   तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांनी तातडीने अग्निशमन दलाची बंब पाठवून तलाठ्याला पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनाघटनेची माहिती मिळताच, त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पीडितेला महिलेला आर्थिक मदत दिली. यावेळी सरपंच हरिदास वाघ उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराCylinderगॅस सिलेंडर