शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

१८.६७ लाखांची वीज चोरी उघड

By admin | Updated: March 17, 2017 03:06 IST

महावितरणच्या विशेष भरारी पथकांची कारवाई

अकोला, दि. १६- महावितरणच्या पाच विशेष भरारी पथकांनी गत आठवड्यात जिल्हय़ात विविध ठिकाणी राबविलेल्या अभियानात एकूण १८ लाख ६७ हजारांची वीज चोरी उघडकीस आली आहे. या कारवाईत ५७ जण थेट वीज चोरी करताना आढळून आले असून, महावितरणने त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणकडून घरगुती, व्यावसायिक व कृषीकरिता वीज पुरवठा दिला जातो. यासाठी महावितरणकडून रीतसर वीज देयक दिले जाते. वीज वापरापोटी ग्राहकांनी विद्युत देयक भरणे अपेक्षित असते; परंतु काही ग्राहक वीज देयक कमी यावे, यासाठी मीटरमध्ये तांत्रिक बदल करणे किंवा थेट विद्युत खांबावरून वीज पुरवठा घेणे आदी प्रकारातून वीज चोरी करतात. तसेच काही ग्राहक विजेचा अनधिकृत वापर करतात. अशा ग्राहकांना चाप लावण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकांकडून कारवाई करण्यात येते. अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम व वर्धा येथील पाच विशेष भरारी पथकांनी गत ६ ते १0 मार्च २0१७ या कालावधीत जिल्हय़ात विविध ठिकाणी छापे टाकून ८९ वीज ग्राहकांच्या जोडण्यांची तपासणी केली. या मोहिमेत ५७ ग्राहकांकडे वीज चोरी होत असल्याचे आढळून आले. यापैकी ५३ वीज ग्राहक वीज कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत (थेट वीज चोरी) दोषी आढळून आले. त्यांनी वापरलेल्या विजेचे मूल्यमापन केले असता, त्यांनी १६ लाख ६७ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. इतर तीन ग्राहकांकडे २ लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. अकोला परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता, प्रभारी उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) नागपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत अकोला उपविभागातील अधिकारी सहभागी झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.