शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

तीन जिल्ह्यात साडेतीन कोटींची वीज चोरी उघड

By admin | Updated: July 25, 2016 01:30 IST

अकोला परिमंडळात १ कोटी ३८ लाख वसूल; १0९९ जण विजेचा अनधिकृत वापर व वीज चोरी करण्यासाठी दोषी.

अतुल जयस्वाल/ अकोलामहावितरणच्या अकोला परिमंडळांतर्गत येत असलेल्या अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये गत आर्थिक वर्षात विविध ठिकाणी ३ कोटी ४४ लाख २0 हजारांची वीज चोरी उघड झाली आहे. महावितरणने केलेल्या कारवाईत १0९९ जण विजेचा अनधिकृत वापर व वीज चोरी करण्यासाठी दोषी आढळून आले आहेत. वीज चोरी करणार्‍यांकडून १ कोटी ३८ लाख रुपयांची वसूली करण्यात महावितरणला यश आले आहे.मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणकडून घरगुती, व्यावसायिक व कृषीकरिता वीज पुरवठा दिला जातो. यासाठी महावितरणकडून रीतसर वीज देयक दिले जाते. वीज वापरापोटी ग्राहकांनी विद्युत देयक भरणे अपेक्षित असते; परंतु काही ग्राहक वीज देयक कमी यावे, यासाठी मीटरमध्ये तांत्रिक बदल करणे किंवा थेट विद्युत खांबावरून वीज पुरवठा घेणे आदी प्रकारातून वीज चोरी करतात. तसेच काही ग्राहक विजेचा अनधिकृत वापर करतात. अशा ग्राहकांना चाप लावण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकांकडून कारवाई करण्यात येते. गत वर्षभरात भरारी पथकांकडून अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये छापे टाकून १0९९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. भारतीय वीज कायद्याच्या कलम १२६ अंतर्गत (विजेचा अनधिकृत वापर) तीन जिल्हय़ांत ९१ लाख २९ हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे उघड झाले आहे. यासाठी दोषी आढळून आलेल्या १७३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली, तर कलम १३५ व १३८ अंतर्गत २ कोटी ५२ लाख ९१ हजार रुपयांची वीज चोरी उघड करण्यात महावितरणच्या भरारी पथकास यश आले आहे. एकूण ३ कोटी ४४ लाख २0 हजारांची वीज चोरी उघड झाली आहे. वीज चोरट्यांवर कारवाई करताना महावितरणने त्यांच्याकडून १ कोटी ३८ लाख रुपयांची वसुली केली आहे. ८७ जणांविरुद्ध गुन्हे दाखलवीज चोरी करणार्‍यांना जरब बसावी, यासाठी महावितरणच्या भरारी पथकांकडून वर्षभर कारवाया करण्यात येतात. वीज चोरी करणार्‍यांकडून दंड व त्यांनी चुकविलेली रक्कम वसूल करण्यात येते. रक्कम व दंड न भरणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात. गत वर्षभरात तीन जिल्हय़ांत ८७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जिल्हानिहाय उघड झालेली वीज चोरीजिल्हा            वीज चोरी (रुपयांमध्ये)अकोला           २ कोटी ५५ लाखबुलडाणा            ४४ लाख १९ हजारवाशिम             ११ लाख १८ हजार-------------------------------------एकूण            ३ कोटी ४४ लाख २0 हजार