शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हायस्पीड ट्रेनकरिता स्पेनमधील तज्ज्ञांनी केली अकोला रेल्वे स्थानकाची पाहणी

By admin | Updated: March 9, 2016 02:20 IST

पहिल्या टप्प्यात स्पेनच्या तज्ज्ञांनी अकोला रेल्वे स्थानकाची आवश्यक माहिती संकलित केली.

अकोला: मुंबई-नागपूरदरम्यान हायस्पीड कॉरिडॉर रेल्वे मार्ग उभारण्याचा प्रकल्प भारतीय रेल्वेने हाती घेतला असून, या मार्गावर भविष्यात धावणार्‍या हायस्पीड ट्रेनसाठी अकोला रेल्वे स्थानकाची पाहणी स्पेनच्या तज्ज्ञांनी मंगळवारी केली. पहिल्या टप्प्यात स्पेनच्या तज्ज्ञांनी अकोला रेल्वे स्थानकाची आवश्यक माहिती संकलित केली. नुकत्याच सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात देशातील काही प्रमुख शहरांदरम्यान हायस्पीड ट्रेन चालविण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेस मूर्त रूप दिले जात आहे. त्या अनुषंगाने देशात हायस्पीड ट्रेन चालविण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानके व रेल्वे मार्गांंचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यास अनुसरून चार स्पॅनिश विशेषज्ञांची एक चमू मंगळवारी दुपारी १२.३0 वाजता अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचली. यामध्ये जॉकीन लिमेंझ, ओट्रो सॉब्रिओ, अल्बटरे मॉस्टिनो व कार्लस विशेषज्ञाचा समावेश होता. अकोल्याचा भूगोल, इतिहासासहित या चमूने अकोल्याची लोकसंख्या, अकोला मार्गे आवागमन होणार्‍या गाड्यांची संख्या व त्यांची माहिती, तसेच राष्ट्रीय महामार्गाशी निगडित सर्व माहितीचे संकलन केले. यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहरातील नव्या आणि जुन्या बससस्थानकांचीदेखील पाहणी करून आवश्यक माहिती संकलित केली. अकोल्यात दाखल होण्यापूर्वी या चमूने अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांचीही पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत सिनिअर डीसीएम सुनील आर. मिश्रा, डीओएम डॉ. स्वप्निल नीला व अकोला रेल्वे स्थानक प्रबंधक एम. के. पिल्ले, अभियंता रायबोले, आरपीएफ पोलीस निरीक्षक राजेश बडे व सीआई महेश निकम आदि उपस्थित होते.