शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मुदतवाढीनंतर नव्यांना संधीची अपेक्षा; अनेकांच्या आला जीवात जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 12:33 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या येत्या निवडणुकीसाठी गट, गणांचे आरक्षण ठरविल्यानंतर जिल्हा परिषदेतील अनेक पदाधिकारी, सदस्यांचा हिरमोड झाला होता. प्रशासनाने ठरविलेले आरक्षणच आता बदलणार आहे.

- सदानंद सिरसाट अकोला: जिल्हा परिषदेच्या येत्या निवडणुकीसाठी गट, गणांचे आरक्षण ठरविल्यानंतर जिल्हा परिषदेतील अनेक पदाधिकारी, सदस्यांचा हिरमोड झाला होता. प्रशासनाने ठरविलेले आरक्षणच आता बदलणार आहे. त्यातच नवे आरक्षण अस्तित्वात येईपर्यंत विद्यमान सदस्यांनाच संधी असल्याने अनेकांच्या जीवात जीव आला. नव्या बदलात काय होईल, ते वेळेवरच पाहू, या मानसिकतेत आता सदस्य आले आहेत.जिल्हा परिषदेची संपुष्टात येणारी मुदत पाहता निवडणूक विभागाने जुलैच्या सुरुवातीला प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया सुरू केली होती. त्या प्रक्रियेत अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट, गणांच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि स्त्रियांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यावेळी अनेकांना धक्का बसला. काहींना त्यांच्या गावांचा समावेश असलेल्या गट, गणांतूनच विस्थापित होण्याची वेळ आली. त्यामुळे निवडणूक लढायचीच, असा निश्चय असलेल्यांनी सोयीचा मतदारसंघ हेरण्याची तयारीही केली. त्याचवेळी स्थानिकांची मनस्थिती, त्यांचा कल जाणून घेण्याचे प्रयत्नही अनेकांनी सुरू केले. त्यातच न्यायालयाच्या आदेशाने आरक्षणाची प्रक्रियाच ‘जैसे थे’ ठेवल्याने ज्यांना संधी होती, त्यांचा हिरमोड, तर ज्यांचा आधी हिरमोड झाला होता, त्यांना नव्या प्रक्रियेतून संधी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र दरम्यानच्या काळात न्यायालयीन प्रकरणात शासनाला वेळकाढू धोरण अवलंबवावे लागले. त्याचा फायदा विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना झाला आहे. त्यामुळे ठरलेल्या आरक्षणाने विस्थापित होण्याची वेळ जिल्हा परिषदेतील ज्या विद्यमान सदस्यांवर आली, त्यांना आॅक्सिजन मिळाला, तर नव्याने समीकरण जुळविण्याची संधी मिळण्याची अपेक्षाही निर्माण झाली. 

हिरमोड झालेल्यांच्या अपेक्षांना धुमारेस्थगित झालेल्या आरक्षण प्रक्रियेत ज्याचे गट आरक्षित झाले होते, त्यामध्ये प्रमुख दहा पदाधिकारी होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शरद गवई, माजी उपाध्यक्ष गुलाम नबी हुसेन देशमुख, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, कृषी सभापती माधुरी गावंडे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, माजी सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव व द्रोपदा वाहोकार या पदाधिकाºयांना मतदारसंघ शोधण्याची वेळ आली होती. त्याशिवाय, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, जिल्हा परिषदेतील सध्याचे भाजपचे गटनेते रमण जैन, गोपाल कोल्हे, सम्राट डोंगरदिवे, प्रतिभा अवचार, शिवसेना महिला आघाडी प्रमुख ज्योत्स्ना चोरे, चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनाही त्यांच्या गटातून धक्का बसला होता. आता ते सर्व निश्चिंत असून, नव्या प्रक्रियेपर्यंत संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत.

 

टॅग्स :Akola ZPअकोला जिल्हा परिषदPoliticsराजकारणAkolaअकोला