धामणगांवबढे : यावर्षी अपूरा पाऊस, उशीरा झालेल्या पेरण्या, पिकावरील विविध रोगांचा प्रादुर्भाव व बोगस बियाणे यावर्षी शेतकर्यांना पिक विम्याची सक्त गरज असतांना शासनाने ह्यपिकह्ण विम्यामधून ह्यमकाह्ण पिकास वगळले आहे.मोताळा तालुक्यामध्ये मका पिकांची पेरणी सुमारे ८ हजार हेक्टरवरती असून कापूस, सोयाबिन नंतर मका पिकांची पेरणी केलेली आहे. यावर्षी मोठय़ा प्रमाणात पिक विमा काढण्यासाठी शेतकर्यांचा प्रयत्न आहे.त्यासाठी शासनाने १५ दिवसांची मुदत वाढ सुध्दा दिलेली आहे. मका पिकास वगळल्यामुळे शेतकर्यांना पिक विम्याचा फायदा घेणार नाही. शेतकर्यांना पीक विमा योजनेचा फायदा व्हावा यासाठी मका पिकाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी पाणलोट समितीचे अध्यक्ष सोपान शहाणे यांचेसह शेतकर्यांनी केली आहे.
पिक विमा योजनेतून ‘मका’ वगळला
By admin | Updated: August 6, 2014 00:26 IST