शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकाच्या ‘शेवटच्या नमस्कारा’ने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST

फोटो : १४०४२०२१-कोल-प्रदीप काळे-पीआय लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कामातील हलगर्जीचा अहवाल आणि पोलीस महासंचालकपदासाठी वरिष्ठांनी शिफारस केली नसल्याच्या ...

फोटो : १४०४२०२१-कोल-प्रदीप काळे-पीआय

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कामातील हलगर्जीचा अहवाल आणि पोलीस महासंचालकपदासाठी वरिष्ठांनी शिफारस केली नसल्याच्या नैराश्येतून विमानतळ सुरक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षक प्रदीप शिवाजी काळे (वय ५२, सध्या रा. एनसीसी भवनमागे, कोल्हापूर, मूळ गाव बार्शी, जि. सोलापूर) यांनी ‘आदरणीय सर्वांना नमस्कार आणि जयहिंद. आज मी अनंताच्या प्रवासाला निघालोय’ असा संदेश बुधवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट करून खळबळ उडवून दिली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबविली असता, वारणा नदीच्या पुलाजवळ ते नशेत बेशुद्धावस्थेत सापडले. काळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे; परंतु पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मात्र आत्महत्येचा प्रकार नसल्याचे म्हटले आहे.

काळे यांनी बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर वादग्रस्त संदेश पोस्ट केला. ६ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा संदेश पोलीस अधीक्षकांनी पाहिला. त्यांनी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली. त्यातील एक पथक काळे यांच्या घरी गेले. तेथे काळे हे तपासासाठी जात असल्याचे सांगून मंगळवारी रात्री दीड वाजता घरातून बाहेर पडल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यांच्याकडून काळे यांचा दुसरा मोबाइल नंबर घेऊन पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले. त्यानुसार काळे हे किणी टोलनाक्याजवळील वारणा नदीच्या पुलाजवळील पायवाटेवर नशेमध्ये बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांना कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

................

बलकवडे यांनी सांगितले की, काळे हे पेठवडगाव पोलीस ठाण्यात ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पेठवडगाव येथे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक धीरजकुमार यांना पदभार देण्यात आला. काळे यांच्या कार्यकाळातील गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे प्रलंबित होते. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र त्यांनी सादर केले नव्हते. त्याबाबत लेखी विचारणा केली. त्यांना म्हणणे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यावर अपर पोलीस अधीक्षकांनी काळे यांच्याबाबतचा कामात हलगर्जीचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला. त्याबाबत आणि पोलीस महासंचालकपद पुरस्कारासाठी शिफारस केली नसल्यावरून काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत या संदेशात नाराजी व्यक्त केली होती.

-----

पोलीस निरीक्षक काळे यांनी संदेशात मांडलेली वस्तुस्थिती नाही. त्यांनी नशेत असताना हा संदेश पाठविला आहे. नाराजी, अडचण मांडण्याची पोलीस दलात विशिष्ट प्रक्रिया, शिस्त आहे. त्याचे पालन काळे यांनी केलेले नाही.

शैलेश बलकवडे,

पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.