शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन

By admin | Updated: September 20, 2016 01:31 IST

अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या हस्ते स्पध्रेचे उद्घाटन.

अकोला, दि. १९- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा सन २0१६-१७ चे आयोजन १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत अकोल्यातील महेश भवन येथे केले आहे. या स्पर्धेत राज्यातील आठ विभागातील १४, १७, १९ वर्षाआतील २४0 खेळाडू (मुले व मुली) सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उज्ज्वला देशमुख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोपीकिसन बाजोरिया, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, जिल्हा ग्रंथपाल सोपान सातभाई,अमरावती विभाग क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, कॅरम महासंघाचे उपाध्यक्ष प्रभजित बछेर, महानगर बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष संदीप पुंडकर, जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सचिव राजेंद्र जळमकर, बुद्धिबळ संघटनेचे सचिव जितेंद्र अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील उपस्थित होते. प्रास्ताविकात शेखर पाटील यांनी, स्पर्धेत २४0 मुले व मुली खेळाडूंसह ४८ संघ व्यवस्थापक सहभागी झाले. विजेते स्पर्धेत तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यात होणार्‍या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन गणेश कुळकर्णी यांनी केले. आभार लक्ष्मीशंकर यादव यांनी मानले. राही रघुवंशीने दिली खेळाडूंना शपथअमरावती विभागाची राष्ट्रीय बुद्धिबळपटू राही रघुवंशी हिने स्पर्धेत सहभागी खेळाडूंना स्पर्धेतील नियमांचे पालन करण्याबद्दलची शपथ दिली.अध्यक्ष विरुद्ध महापौरस्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे आणि महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यात लढत लावून करण्यात आले.'शतरंज के खिलाडी'आमदार गोपीकिसन बाजोरिया आणि मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यातही लढत झाली. राजकारण आणि प्रशासनात बुद्धीचे बळ लावणारे हे दोघेही 'शतरंज के खिलाडी' या स्पर्धेनिमित्त आमने-सामने आले होते.