शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फोर-जी केबलचे खोदकाम; मनपाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:23 IST

शहरातील महामार्गांलगत खोदकाम करून मोबाइल कंपन्यांनी किती अंतराचे केबल टाकले, यासंदर्भात सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गांलगत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकण्यासाठी मनपाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचा मोबाइल कंपन्यांचा दावा तपासण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी ‘पीडब्ल्यूडी’ला पत्र जारी केले आहे. शहरातील महामार्गांलगत खोदकाम करून मोबाइल कंपन्यांनी किती अंतराचे केबल टाकले, यासंदर्भात सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. फोर-जी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाच्या पत्रावर ‘पीडब्ल्यूडी’कडून तातडीने माहिती मिळणे अपेक्षित असल्याचे बोलल्या जात आहे.मागील दोन वर्षांपासून महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते असो वा प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांलगत खोदकाम करून फोर-जी सुविधेसाठी फ ायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकण्याचा सपाटा विविध मोबाइल कंपन्यांनी लावल्याचे उघडकीस आले आहे. शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी शहरात २६ किलोमीटर अंतराचे फायबर आॅप्टिक केबल टाकण्यासाठी स्टरलाइट टेक कंपनीला मनपाने ९ डिसेंबर २०१९ रोजी परवानगी दिल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपनीला एका पाइपद्वारे ‘सिंगल’ केबल टाकण्याची परवानगी असताना या कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार मनपाच्या तपासणीत उघडकीस आला आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, ज्या भागात स्टरलाइटने केबल टाकले, त्या केबलसोबतच चक्क रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीचे तब्बल चार-चार पाइप मनपा प्रशासनाला आढळून आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मनपा क्षेत्रातील महामार्गांलगत खोदकाम करून केबल टाकण्यासाठी मनपाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचा दावा संबंधित मोबाइल कंपन्यांसह मनपाच्या बांधकाम विभागातील प्रामाणिक अधिकाऱ्यांकडूनही केला जातो. ही बाब तपासण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी ४ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र जारी करीत मनपा क्षेत्रात संबंधित कंपन्यांनी आजपर्यंत किती अंतराचे खोदकाम केले, याबद्दल सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बांधकाम विभागाचा हवेत कारभारमनपाच्या तपासणीत रिलायन्स कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी रिलायन्सने आजवर टाकलेल्या केबलचा शोध घेऊन ते खंडित करण्याचा आदेश बांधकाम विभागाचे प्रभारी शहर अभियंता सुरेश हुंगे, प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर यांना दिला आहे. याप्रकरणी ठोस कारवाई करण्यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी मनपाला निर्देश दिल्यावरही अद्यापपर्यंत दोन्ही अधिकाºयांनी धडक कारवाईला प्रारंभ केला नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका