शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी ८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान

By admin | Updated: February 1, 2016 02:09 IST

व्यवसाय शिक्षण निवडण्यासाठी ठरणार निर्णायक.

प्रवीण खेते/अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची कल चाचणी (मानसशास्त्रीय चाचणी) ८ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी असून, येथूनच विद्यार्थी शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांच्या निवडीला प्रारंभ करतात; परंतु या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते चुकीच्या क्षेत्राकडे वळतात. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये ताण-तणाव, नैराश्याचे प्रमाण वाढीला लागते. या प्रकाराला आळा घालून, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य ठरेल, यादृष्टीने कल चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या अंतर्गत गत दोन महिन्यांपासून राज्यभरात कल चाचणीची तयारी सुरू असून, ९ ते २३ डिसेंबर २0१५ या कालावधीत राज्यातील प्रत्येक शाळेतील सर्व संगणकांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा स्तरावर जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयकांची निवड करून एक समिती गठित करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यात जिल्हा पातळीवर प्रत्येक मुख्याध्यापकांना तसेच निवडण्यात आलेल्या संगणक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्यात कल चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असून, येत्या ८ फेब्रुवारीपासून कल चाचणी घेण्यात येणार आहे. ही कल चाचणी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, २५ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. १५२ प्रश्नांची कल चाचणीविद्यार्थ्यांंचा कल ओळखण्यासाठी घेण्यात येणार्‍या मानसशास्त्रीय चाचणीमध्ये एकूण १५२ प्रश्न राहणार आहेत. चाचणीसाठी विद्यार्थ्यांना ४0 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना मिळणार रिपोर्ट कार्डइयत्ता दहावीच्या निकालासोबतच विद्यार्थ्यांना कल चाचणीचे रिपोर्ट कार्ड मिळणार आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्राची निवड करताना विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे.