शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीची होणार तपासणी

By admin | Updated: August 29, 2014 01:55 IST

तीन वर्षातील लागवडीच्या कामांची केली जाणार तपासणी

संतोष येलकर/अकोलामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ग्रामपंचायतींमार्फत गेल्या तीन वर्षांमध्ये करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या कामांची विशेष तपासणी केली जाणार जाणार आहे. माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षक तसेच विद्यार्थ्यांच्या हरित संरक्षण गटांकडून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत ही तपासणी केली जाणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविला जातो. रस्त्याच्या दुतर्फा, पडीक शेतजमीन, शाळा, सार्वजनिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात वृक्ष लागवड केली जाते. लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारीही काही कुटुंबांवर सोपविली जाते. या पृष्ठभूमीवर सन २0११, २0१२ आणि २0१३ या तीन वर्षाच्या पावसाळी हंगामात ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत गत १९ ऑगस्ट रोजी एका परिपत्रकाव्दारे देण्यात आले होते. त्यानुसार ही विशेष तपासणी २५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत केली जाणार आहे. वृक्ष लागवड झाली नाही, रोपे जीवंत आहेत की नाही, ज्या ठिकाणी रोपे जीवंत नाहीत, त्या ठिकाणी पुनर्लागवड करणे, अशी सुधारणात्मक कृती हाती घेणे हा या विशेष तपासणी मोहिमेचा उद्देश आहे. विशेष तपासणी मोहिमेसाठी जिल्हानिहाय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील या समित्यांमध्ये सदस्य सचिव म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक आणि सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), उपजिल्हाधिकारी (रोहयो), शिक्षणाधिकरी इत्यांदींचा समावेश आहे. तपासणीचा अहवाल हरित संरक्षण गटांमार्फत सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालक व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हानिहाय अहवाल शासनाच्या संबंधित विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत.उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे यांनी ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्याबाबतचे शासन परिपत्रक २२ ऑगस्ट रोजी प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी एक तृतीयांश ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीच्या कामांची तपासणी १ सप्टेंबरपासून अकोला जिल्ह्यात सुरु करण्यात आहे. ज्या ठिकाणी हरित संरक्षण गटांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी तपासणीच्या कामासाठी एनएसएस विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगीतले. *वृक्ष लागवडीच्या कामाचे वास्तव येणार समोर!ग्रामपंचायतीअंतर्गत गेल्या तीन वर्षांत करण्यात आलेली वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये ग्रामपंचायतींनी केलेली वृक्ष लागवड, त्यावर करण्यात आलेला खर्च आणि सध्या जीवंत असलेली रोपे याबाबतचे वास्तव या तपासणीतून समोर येणार आहे.