शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कावीळ आजाराला प्रत्येकाने समजून घेण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST

२८ जुलै रोजी साजरा होणाऱ्या जागतिक कावीळ दिनानिमित्त जनजागरणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. तापडिया म्हणाले की, ...

२८ जुलै रोजी साजरा होणाऱ्या जागतिक कावीळ दिनानिमित्त जनजागरणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. तापडिया म्हणाले की, कावीळमध्ये हिपेटायटिस बी आणि हिपेटायटिस सी हे व्हायरस जास्त महत्त्वपूर्ण असून, टक्केवारीनुसार हिपेटायटिस बीचे प्रम‍ाण २-५ टक्के व हिपेटायटिस सीचे - १-२ टक्के असे आहे. कावीळच्य‍‍ा विषाणूच्या प्रभावाने यकृतावर सूज निर्माण होऊन त्यातील पेशी नष्ट होऊन यकृत कडक होते. रुग्णांच्या लक्षात येईपर्यंत त्यातील अर्ध्याहून अधिक विकृत पेशी नष्ट होऊन त्याची कार्यक्षमता कमी होते. कावीळची कारणे निरनिराळी असली तरी घरातील कोणालाही या रोगाची बाधा झाली असल्यास, असुरक्षित यौनसंबंध, बाधित व्यक्तीचे रक्त घेतले असल्यास, विषाणूने बाधित सुईने इंजेक्शन दिल्यास, टॅटू अर्थात गोंदण करून घेतल्यावर, दूषित पाणी पिल्यास हा रोग होऊ शकतो. भूक न लागणे, अशक्तपणा, पिवळेपणा, लघवी पिवळी होणे ही या काविळीची प्राथमिक लक्षणे डॉक्टर सांगतात.

कावीळ पाच प्रकारचे

कावीळ पाच प्रकारचे असले तरी यातील महत्त्वाचे बी व सी दोन हिपेटायटिस गंभीर आहेत. हिपेटायटिस बी हा प्रकार फार गंभीर आहे. दोन्ही प्रकारातील लक्षणे काही प्रमाणात सारखी असली तरी हिपेटायटिस सीमध्ये ताप, थकवा, डोकेदुखी, भूक न लागणे, मळमळणे, पोटदुखी, लघवी गडद होणे, मातकट रंगाची विष्ठा आदी लक्षणे रुग्णांमध्ये दिसतात. सी प्रकारात शंभरपैकी ७५ जणांमध्ये दीर्घकालीन जुनाट संसर्ग विकसित होतो. जुनाट हिपेटायटिस सी असलेले ७५ पैकी २० रुग्ण खूप आजारी पडतात.