शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कट्यार येथील शेतक-याचा मृत्यू

By admin | Updated: December 15, 2014 01:12 IST

कट्यार येथील शेतक-याने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न.

अकोला - कर्ज आणि दुष्काळाच्या फेर्‍यात सापडलेल्या कट्यार येथील शेतकर्‍याने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पत्नीच्या जागरुकतेमुळे त्याला वाचविण्यात आले होते. सवरेपचार रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणार्‍या या शेतकर्‍याचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी आणि दोन मुलींचे छत्र हरविले असून, त्यांच्या उदरनिर्वाहासह कर्ज फेडण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.कट्यार येथील रहिवासी गणेश शालीग्राम दंदी (४८) यांच्याकडे तीन एकर शेती असून, त्यांनी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३0 हजार रुपयांचे कर्ज घेऊन शेतात पेरणी केली. सोयाबीन आणि मूग पेरल्यानंतर थोड्या प्रमाणात पाऊस आला. चांगले पीक होण्याची अपेक्षा होती, मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने मूग होता त्याच अवस्थेत करपला. दीड एकरामध्ये ७0 ते ८0 किलो सोयबीन झाले आणि हरभरा पेरला तरी उगवण्याची शाश्‍वती नव्हती. त्यामुळे बँकेचे आणि एका खासगी व्यक्तीकडून घेतलेले कर्ज फेडणे तसेच संसाराचा गाडा पुढील एका वर्षापर्यंत चालविणे अशक्य वाटल्याने गणेश दंदी यांनी राहत्या घरात मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार त्यांची पत्नी शोभा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा-ओरड केली. महिलेचा आवाज ऐकताच घराच्या आजूबाजूची मंडळी मदतीसाठी धावल्याने गणेश दंदी यांचे प्राण वाचले; त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र रविवारी सायंकाळी गणेश दंदी यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पत्नी, दोन मुलींना सोडून त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आत्महत्येने कुटुंबावरील संकट अधिक वाढले असून, दोन मुलींचा उदरनिर्वाह आणि कर्ज फेडण्याचा मोठा प्रश्न आता त्यांची पत्नी शोभा यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने मदत जाहीर केली आहे, मात्र शेतकर्‍यांना नेमकी किती मदत मिळणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकरी पुरता खचला असून, आजही आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे.