शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

दरवर्षी आषाढ आणि श्रावण महिन्यात सणानिमित्त नवविवाहितांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गाव-खेड्यात वेगळ्या प्रकारचा आनंद, जल्लोष आणि ...

दरवर्षी आषाढ आणि श्रावण महिन्यात सणानिमित्त नवविवाहितांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गाव-खेड्यात वेगळ्या प्रकारचा आनंद, जल्लोष आणि विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यामध्ये सुख-दुःखाच्या गोष्टी होतात. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी कोरोना निर्बंधामुळे यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे विवाहितेला माहेरी जाण्यासाठी ओढ लागली आहे. परंतु कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून बहुतांश नवविवाहितांना आपल्या माहेरी जाता आले नाही. निर्बंध शिथिल झाल्याने काही महिला माहेरी जात आहे; परंतु अद्याप कोरोनाचा धोका न टळल्याने काही नवविवाहितांना जाणे शक्य होत नाही. हा कोरोना लवकर जावो, अशी प्रार्थना अनेकजणी करीत आहेत.

कोरोनाकाळात विवाहांची नोंद

२०२०-२०२१ २७३

नवविवाहितांच्या भावना

माहेरला जाण्याची लागली ओढ

लग्न झाल्यानंतर माहेरला जाण्याची ओढ लागली आहे; परंतु यावर्षी कोरोनामुळे आषाढ सणाचा उत्सव साजरा करता येणार नाही व माहेरी जाता येणार नाही.

- संध्या भोंगाडे, नवविवाहिता

खबरदारी म्हणून टाळते!

गत दीड वर्षापासून कोरोनामुळे माहेरी जाण्यासाठी अडचणी येत आहे. निर्बंंध असल्याने जाणे शक्य होत नाही. तसेच विदेशात राहात असल्याने आणखी अडचणी वाढल्या. मात्र, कोराेनामुळे खबरदारी म्हणून माहेरी जाणे टाळत आहे.

- प्रियंका तिनखेडे, नवविवाहिता

नवविवाहितांच्या आईची भावना

काळजी म्हणून बोलावत नाही!

मुलीचा आषाढ सण आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आम्ही मुलीला बोलावले नाही. तरी फोनवर बोलून समाधान होते.

- प्राजक्ती बहाड

निर्बंध शिथिल होण्याची अपेक्षा

कोरोनामुळे मुलीला माहेरी येता आले नाही. संपूर्ण जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर जाण्यासाठी प्रार्थना करत आहे. निर्बंध लवकर शिथिल होण्याची अपेक्षा आहे.

- निर्मला कोकाटे