शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५ टक्के रीडिंगच्या फेरतपासणीनंतरही ‘अ‍ॅव्हरेज’ बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 02:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रीडिंग एजन्सीकडील कर्मचारी सदोष रीडिंग घेताना निदर्शनास येत असल्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचाºयांकडून दररोज ५ टक्के मीटर रीडिंगची फेरतपासणी राज्यभर सुरू आहे. गत महिन्यापासून ही पद्धत अवलंबिल्या जात असली, तरी अकोल्यात अजूनही सदोष मीटर रीडिंग होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे अनेक वीज ग्राहकांना ‘अ‍ॅव्हरेज’ बिलाचा फटका ...

ठळक मुद्देसदोष मीटर रीडिंगच्या तक्रारी सुरूच; वीज ग्राहक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रीडिंग एजन्सीकडील कर्मचारी सदोष रीडिंग घेताना निदर्शनास येत असल्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचाºयांकडून दररोज ५ टक्के मीटर रीडिंगची फेरतपासणी राज्यभर सुरू आहे. गत महिन्यापासून ही पद्धत अवलंबिल्या जात असली, तरी अकोल्यात अजूनही सदोष मीटर रीडिंग होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे अनेक वीज ग्राहकांना ‘अ‍ॅव्हरेज’ बिलाचा फटका सहन करावा लागत आहे.ग्राहकांना अचूक व योग्य वीज देयक देण्यासाठी महावितरणने मोबाइल अ‍ॅप्सद्वारे वीज मीटर रीडिंगची प्रणाली विकसित केल्यामुळे रीडिंगची पद्धत सोपी झाली आहे; मात्र रीडिंग एजन्सीकडील कर्मचारी मात्र सदोष रीडिंग घेत असल्याच्या तक्रारी कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यातील अनेक वीज ग्राहकांना जून महिन्याचे बिल ‘अ‍ॅव्हरेज’ आले. वीज मीटर व्यवस्थित असताना अ‍ॅव्हरेज बिल कसे येऊ शकते, असा सवाल अनेक ग्राहकांनी उपस्थित केला आहे. जून महिन्यात वीज वापर कमी असतानाही उन्हाळ्यातील तीन महिन्यांची सरासरी लक्षात घेऊन काढण्यात आलेले बिल जास्त असल्याच्या तक्रारी वीज ग्राहकांकडून येत आहेत. सदोष मीटर रीडिंग घेणाºया रीडिंग एजन्सीच्या दोन कर्मचाºयांवर गत आठवड्यात नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या निर्देशांवरून कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे चालू महिन्यात सदोष मीटर रीडिंगला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वीज ग्राहकांनीही जागृत होण्याची गरजसदोष मीटर रीडिंगमुळे वीज बिल अव्वाच्या सव्वा येणे, अ‍ॅव्हरेज बिल येणे, असे प्रकार वाढीस लागल्याच्या पृष्ठभूमीवर वीज ग्राहकांनीही जागृत होणे गरजेचे आहे. वीज ग्राहकांनी आपला ग्राहक क्रमांक महावितरणकडे नोंदणी केल्यास वीज बिलाची माहिती घरबसल्या एसएमएसद्वारे मिळते. तसेच मीटर रीडिंग घेतले गेले नाही, तर तसा एसएमएस येऊन मोबाइल अ‍ॅपद्वारे आपले रीडिंग आपणच पाठविण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होऊ शकते. याशिवाय सुविधा केंद्रांमध्ये जाऊन तक्रारही करता येते.