शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप लोकप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन मिशन

By admin | Updated: May 25, 2017 01:24 IST

राज्यात १२ हजार विस्तारक : अकोट येथे प्रशिक्षण वर्ग

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : केंद्रात व राज्यात सत्ता आल्यानंतर विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या. या योजना पारदर्शकपणे राबवूनही भाजपाला अनेक ठिकाणी विरोध पत्करावा लागत आहे. नोटाबंदी, तूर खरेदी तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य, सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधी पक्षाने घेतलेली भूमिका पाहता, भाजपाचा सकारात्मक चेहरा असतानाही जनतेत नकारात्मक पडसाद उमटत आहेत. या पडसादाचे उत्तर शोधण्यासाठी भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन राज्यभर केले जाणार आहे. त्याकरिता राज्यात ११ हजार ५०० विस्तारक पाठविले जाणार असल्याची माहिती आहे. लोकप्रतिनिधी शेवटच्या घटकापर्यंत भाजपाचे सकारात्मक कार्य पोहोचविण्याकरिता कमी पडत आहेत का, याचे मूल्यमापन मिशन, संवाद शिवार यात्रा, कार्य विस्तार योजना, धुऱ्यावरची चर्चा असे विविध अभियान राबवून जनतेच्या मनातील उकल केली जाणार असल्याचा सूर अकोट येथे पं. दीनदयाल शताब्दी कार्य विस्तार योजनेच्या माध्यमातून आयोजित विस्तार व प्रशिक्षण वर्ग शिबिरात ऐकावयास मिळाला. केंद्र व राज्य सरकारने विविध योजना आणलेल्या आहेत. १२ रुपयांच्या विमा पॉलिसीपासून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना लोकहितार्थ आहेत; परंतु या योजना गावागावांतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात अनेक लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. विरोधकांच्या तुलनेत लोकप्रतिनिधींचे कार्य कमी पडत असल्याने विरोधक भाजपवर तोंडसुख घेत आहेत. अशा स्थितीत भाजपला भविष्यातील निवडणुकांमध्ये कुठलाही फटका बसू नये, या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येतात की नाही, याकरिता राज्यभर लोकप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन करण्याकरिता तसेच भाजपचे कार्य, योजना घराघरांत पोहोचविण्याकरिता देशभर विस्तारक नेमले जात आहेत. त्या माध्यमातूनच त्यांना प्रशिक्षण देण्याकरिता राज्यभर जिल्हा पातळीवर प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येत आहेत. भाजपा वर वर केवळ योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता व संघटन बांधणीकरिता विस्तारक नेमत असल्याचे दाखवित असले, तरी भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन करण्याकरिताच हा खटाटोप सुरू असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहेत. विशेष म्हणजे, आमदार गिरीश व्यास यांनीसुद्धा या विस्तारकांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती दिली जाणार. शिवाय, जनतेकडून लोकप्रतिनिधींच्या कार्याबाबत टिप्पण आल्यास पक्षश्रेष्ठींकडून त्याचे मूल्यमापन केले जाणार असल्याच्या दुजोरा दिला आहे. कार्य विस्तारकांच्या माध्यमातून जनतेशी संवादभाजपाचे कार्य विस्तार योजना २५ मे ते ७ जून या कालावधीत संपूर्ण देशभर राबविल्या जाणार आहे. या योजनेंतर्गत भाजपाचा कार्यकर्ता आपल्या घरापासून दूर सर्वसामान्य नागरिकांसोबत राहून केंद्र व राज्य सरकारच्या सुरू असलेल्या योजना, भाजपाचे विचार पोहोचविणार आहे. जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीसतथा आमदार गिरीश व्यास यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. या कार्य विस्तार योजनेकरिता केंद्रातील मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार, केंद्र व राज्यातील पदाधिकारी शिवार संवाद यात्रा, तालुका ते गाव पातळीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चर्चा करणार आहेत. त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. शिवाय, केंद्र व राज्य सरकारच्या त्यांच्याकरिता असलेल्या योजनांची माहिती देणार आहेत. ही कार्य विस्तार योजना राबविताना लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचे उद्घाटन, भूमिपूजन करणार नाहीत. केवळ संवादाचे आदान-प्रदान केले जाणार आहेत. या कार्य विस्तार योजनेच्या वेळी संवाद साधताना लोकप्रतिनिधींबाबत काही तक्रारी असतील, त्याही ऐकून घेतल्या जाणार आहेत. योजनेदरम्यान गोळा झालेली माहिती पक्षश्रेष्ठींकडे पाठविली जाणार आहे. कार्य विस्तार योजना व्यापक स्वरूपात राबविली जात असल्याने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेसुद्धा अकोला येथे येणार असल्याचे आमदार गिरीश व्यास यांनी सांगितले. कार्यविस्तार योजनेमध्ये विस्तारक म्हणून काम करण्यास ११ हजार ५०० कार्यकर्ते तयार असून, त्या कार्यकर्त्यांना रहिवासी कार्यक्षेत्र सोडून इतर भागात पाठविले जाणार आहे. शिवाय, भाजपाने ४० प्रवक्त्यांची टीम तयार केली असून, ही टीम माध्यमांच्या संपर्कात राहणार आहे. देशपातळीवर कार्य विस्तार योजना राबविली जात असून, त्याचे प्रशिक्षण वर्ग सध्या विविध राज्यात घेण्यात येत आहेत.