शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी फिरते पथक स्थापन; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By संतोष येलकर | Updated: October 27, 2023 17:56 IST

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा निर्णय

अकोला : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी फिरते पथक स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून, त्यानुसार यासंदर्भात समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी आदेश निर्गमित केला.

अकोला शहरातील बाजारपेठा, गांधी चौक, खुले नाट्यगृह परिसर, कापड बाजार, शाळा, महाविद्यालयाचा परिसर, आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहने नो पार्किंग झोनमध्ये उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, नागरिकांना नियम व तरतुदी समजावून सांगणे, अशा ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करणे यासाठी फिरते पथक स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला. त्यानुसार पथक स्थापन्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला.

पथकात यांचा आहे समावेश आदेशानुसार, वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक सुनील किनगे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहायक अधिकारी प्रवीण मिश्रा यांचा या पथकात समावेश आहे.दंडात्मक कारवाइ करा;दर शुक्रवारी अहवाल सादर करा !स्थापन करण्यात आलेल्या पथकाने विविध ठिकाणी आकस्मिक भेटी देऊन वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, वाहतूक नियम मोडणाऱ्या नागरिकांना नियमांची माहिती द्यावी. आठवड्यातील कारवाईचा अहवाल दर शुक्रवारी सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात देण्यात आले आहेत.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला