शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातही झाला होता क्रांतीचा उद्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:03 IST

अकोला: मुंबई येथील क्रांती मैदानावर ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अंतिम लढय़ाची घोषणा केली. ‘करा किंवा मरा’ असा संदेश दिला. त्यामुळे महात्मा गांधींना अटक झाली आणि त्यांच्या अटकेचा निषेधार्थ भारतीयांनी क्रांतीचा हुंकार फुंकला. क्रांतीच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.  त्याचे लोण अकोल्यातही पसरले होते. मोर्चा, सत्याग्रह, चले जाव आंदोलनाने अकोला शहर दणाणून गेले होते. तो काळ अविस्मरणीय, प्रेरणादायी होता.  

ठळक मुद्दे क्रांती दिन विशेषअनेकांनी पत्करला तुरुंगवास

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मुंबई येथील क्रांती मैदानावर ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या अंतिम लढय़ाची घोषणा केली. ‘करा किंवा मरा’ असा संदेश दिला. त्यामुळे महात्मा गांधींना अटक झाली आणि त्यांच्या अटकेचा निषेधार्थ भारतीयांनी क्रांतीचा हुंकार फुंकला. क्रांतीच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.  त्याचे लोण अकोल्यातही पसरले होते. मोर्चा, सत्याग्रह, चले जाव आंदोलनाने अकोला शहर दणाणून गेले होते. तो काळ अविस्मरणीय, प्रेरणादायी होता.  अकोल्यातील ऑगस्ट क्रांती लढय़ामध्ये स्वातंत्र्यसेनानी स्व. अच्युतराव देशपांडे, स्व. प्रमिलाताई ओक, मुनी गुरुजी, लक्ष्मणराव गोडबोले, हिरुळकर गुरुजी, देवीदासजी गरड आदी त्याकाळातील स्वातंत्र्यसंग्रामातील धडाडीचे नेते होते. स्वातंत्र्यासाठी अनेक काळ या सर्व नेत्यांनी काही तुरुंगवास भोगला. स्व. प्रमिलाताई ओक, विमलताई देशपांडे यांच्या नेतृत्वात प्रभातफेर्‍या, राष्ट्रीय झेंड्याची मिरवणूक, पत्रके वाटण्याचे काम केले. १३ ऑगस्ट १९४२ साली. क्रांती लढय़ाचा सर्वात मोठा मोर्चा निघाला. त्यात महिला अग्रभागी होत्या. या महिलांनीच काँग्रेस मैदान (आताचे स्वराज्य भवन) येथे राष्ट्रीय झेंडा फडकवण्याचा प्रयोग झाला. पोलिसांनी बलाचा वापर करून लाठीमार केला. महिलांच्या मोर्चावर लाठीमार केल्याने लोक खवळले होते. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी क्रूर लाठीमार केला. अनेक लोक जखमी झाले. यात अनेक स्वातंत्र्यसेनानींना अटक झाली होती. स्वातंत्र्यसेनानी देवीदास गरड यांनी साथीदारांच्या मदतीने त्यांच्या घरातच बॉम्बची निर्मिती केली होती; परंतु बॉम्ब बनविण्यामध्ये काही त्रुटी राहिल्याने, बॉम्बचा अचानक स्फोट झाला. त्यात देवीदास गरड आणि त्यांचे काही साथीदार गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर ब्रिटिशांनी गरड यांना अटक केली होती. त्या काळी वाडेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सभा झाली होती. भाटे क्लबच्या मैदानावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सभा घेऊन नागरिकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची जाज्वल्य भावना निर्माण केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोससुद्धा त्यादरम्यान अकोल्यात येऊन गेले. त्या काळी तर टिळक राष्ट्रीय शाळासुद्धा क्रांती लढय़ाचा एक भाग बनली होती. टिळक राष्ट्रीय शाळेतून अनेक विद्यार्थी क्रांती लढय़ात सहभागी झाले होते. 

सुखदेव, राजगुरूंनी घेतला होता आश्रय स्वातंत्र्यलढा तीव्र करण्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्यसेनानी अकोल्यात येऊन गेले. महान स्वातंत्र्यसेनानी सुखदेव, राजगुरू यांची धरपकड करण्यासाठी ब्रिटिशांनी मोहीम अधिक तीव्र केली होती. उत्तर भारतात राहणे असुरक्षित होते. या कारणामुळे सुखदेव, राजगुरू यांना काही स्वातंत्र्यसैनिकांनी अकोल्यात आश्रय दिल्याची नोंद आहे.