शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या ऑटोडीसीआर प्रणालीत त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:38 IST

अकोला : महापालिका प्रशासनाने इमारत, घरे बांधण्याकरिता  नकाशा मंजुरीसाठी ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित केली. या  प्रणाली अंतर्गत नकाशा मंजूर केल्यानंतर नगररचना  विभागाकडून अंतिम मंजुरी दिली जाते. प्रशासनाचा उद्देश योग्य  असला, तरी ऑटोडीसीआर प्रणालीतील त्रुटींमुळे अकोलेकरांना  चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे एक  महिन्याच्या आत या प्रणालीतील त्रुटी दूर करण्याचे निर्देश  शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी सोमवारी मनपा  आयुक्तांना दिले आहेत. 

ठळक मुद्देआ. गोपीकिशन बाजोरियांचे मनपाला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाने इमारत, घरे बांधण्याकरिता  नकाशा मंजुरीसाठी ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित केली. या  प्रणाली अंतर्गत नकाशा मंजूर केल्यानंतर नगररचना  विभागाकडून अंतिम मंजुरी दिली जाते. प्रशासनाचा उद्देश योग्य  असला, तरी ऑटोडीसीआर प्रणालीतील त्रुटींमुळे अकोलेकरांना  चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे एक  महिन्याच्या आत या प्रणालीतील त्रुटी दूर करण्याचे निर्देश  शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी सोमवारी मनपा  आयुक्तांना दिले आहेत. शहरात व्यावसायिक संकुल, रहिवासी इमारती किंवा घरे  बांधण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा  मंजूर करावा लागतो. नगररचना विभागाकडे नकाशा मंजुरीचा  प्रस्ताव सादर केल्यानंतर पहिल्यांदा जोत्यापर्यंत (प्लिंथ)  बांधकामाची परवानगी दिली जाते. जोत्यापर्यंत बांधकाम पूर्ण  केल्यावर पुढील बांधकामासाठी पुन्हा नगररचना विभागाची  परवानगी आवश्यक ठरते. यादरम्यान, नकाशा सादर करताना  प्लॉटचे क्षेत्रफळ, कृषक-अकृषक असण्यासोबतच शिट  क्रमांक आदी इत्थंभूत माहिती कागदोपत्री सादर करावी लागत  होती. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे महापालिका प्रशासनाने  नकाशा मंजुरीसाठी ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित  करण्याचा निर्णय घेतला. ऑटोडीसीआर पद्धतीनुसार  मालमत्ताधारकाला आर्किटेक्टच्या सहाय्याने ऑनलाइन अर्ज  सादर करणे भाग आहे. त्यासाठी मनपाने रीतसर आर्किटेक्ट,  अभियंत्यांची निवड केली आहे. ऑटोडीसीआरचा कंत्राट पुणे  येथील कंपनीला देण्यात आला आहे.  ही प्रणाली कार्यान्वित  केल्यानंतर नकाशा मंजुरीची कामे झटपट निकाली निघतील,  अशी अपेक्षा होती. तसे न होता ऑटोडीसीआर प्रणालीनुसार  नकाशा मंजूर केल्यानंतर प्रस्ताव नगररचना विभागाकडे सादर  केला जातो. या विभागाकडून नकाशात काही त्रुटी असल्यास  त्या दूर केल्या जातात. ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ व खर्चिक  असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना  मनस्ताप सहन करावा लागत आहे. अर्थात, कोणताही नकाशा  ऑटोडीसीआर प्रणालीद्वारे मंजूर होत असेल, तर त्यामध्ये त्रुटी  निघण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे शिवसेना आ. गो पीकिशन बाजोरिया यांनी पत्रात नमूद केले आहे. तसे होत  असेल, तर ही प्रणाली सदोष असल्याचे दिसून येते. त्यामुळे  प्रशासनाने एक महिन्याच्या आत ऑटोडीसीआरमधील त्रुटी दुर  कराव्यात तोपर्यंत जुन्या पद्धतीनुसार नकाशा मंजूर करून  नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश मनपा आयुक्त अजय लहाने  यांना दिले आहेत.

ऑटोडीसीआर प्रणालीमध्ये मालमत्ताधारकाचा भूखंड कोणत्या  भागात आहे, त्याठिकाणी आरक्षण आहे का, ती जागा गावठाण  आहे का, आदी बाबी स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे या प्रणालीद्वारे  नकाशा मंजूर केल्यानंतर प्रस्ताव नगररचना विभागाकडे सादर  केला जातो. नकाशा तातडीने मंजूर करण्यासाठी पंधरा दिवसां पूर्वी संबंधित विभागाची बैठक घेतली होती. या प्रणालीत त्रुटी  असल्यास त्यामध्ये सुधारणा केली जाईल.-अजय लहाने, आयुक्त मनपा