शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूर व पुणे संघाची बरोबरी

By admin | Updated: December 22, 2014 00:34 IST

१९ वर्षाआतील राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा.

नीलिमा शिंगणे/ अकोला: येथील वसंत देसाई क्रीडांगणावर रविवारी पार पडलेल्या १९ वर्षाआतील राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूर व पुणे विभाग संघाच्या खेळाडूंनी गुणानुक्रमे बरोबरी साधली. दोन्ही संघाने मुले व मुलींच्या गटात प्रत्येकी ११ पदकांची कमाई केली. मुलांच्या गटात कोल्हापूर संघाने ८ तर मुलींच्या गटात ३ पदक मिळविली. पुणे संघाने मुलांच्या गटात ६ तर मुलींच्या गटात ५ पदके पटकाविले. शनिवारी सायंकाळी झालेल्या मुलींच्या गटातील अंतिम फेरीमध्ये ६९ किलो वजनगटात कोल्हापूरच्या मयूरी देवरे हिने पुण्याच्या शरयू काळे हिच्यावर मात केली. नाशिकची करुणा गाढे तृतीय स्थानावर राहिली. ७५ किलो वजनगटात क्रीडापीठाची किरण जोतवाणी हिने प्रथम स्थान पटकाविले. नाशिकची ऋतुजा अहिरे द्वितीय आणि पुण्याची सोनल कानडे तिसर्‍या स्थानावर राहिली. ७५ किलोच्या वर वजनगटात नाशिकच्या रेणुका नलावडे हिने कोल्हापूरच्या अश्‍विनी मलगेचा पराभव केला. मुंबईच्या आशिका भोईर तृतीय स्थानावर राहिली.मुलांच्या गटातील रात्री उशिरापर्यंत चाललेल्या अंतिम फेरीत ८५ किलो वजनगटात कोल्हापूरचा घनश्याम देसाई याने लातूरच्या हरजिंदरसिंग जगतसिंग गाडीवाले याचा पराभव केला. पुण्याचा समाधान माने याने तिसरे स्थान मिळविले. ९४ किलो वजनगटात पुण्याच्या राजू आसवले याने प्रथम, कोल्हापूरचा विनायक हजारे द्वितीय आणि अमरावतीचा अक्षय उदेकर तृतीय ठरला. १0५ किलो वजनगटात पुणे विभागाचा महादेव जाधव प्रथम, कोल्हापूरचा प्रथमेश पावसकर द्वितीय आणि मुंबईचा भावेश कोणकर तिसर्‍या स्थानावर राहिला. १0५ किलोच्या वर वजनगटात मुंबईचा शुभम कुमावत याने प्रथम क्रमांक पटकाविला. कोल्हापूरचा अर्जुन मलगे याने दुसरा क्रमांक मिळविला. नागपूरचा देवाशिष जयपूरकर याने तिसरा क्रमांक मिळविला.