शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष बिघडवणार पक्षीय उमेदवारांची समीकरणे?

By admin | Updated: October 6, 2014 01:45 IST

पश्‍चिम वर्‍हाडात ११७ अपक्ष उमेदवार रिंगणात.

राजरत्न सिरसाट/ अकोलापश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारिप-बहुजन महासंघात बंडखोरी उफाळून आली असून, या विधानसभा निवडणुकीत तीन जिल्हय़ात ११७ अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. यात विद्यमान आमदारांसह पक्षांच्या पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. यामुळे हे अपक्ष उमेदवार पक्षांच्या उमेदवारांची गोळाबेरीज बिघडवतात का, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.या विधानसभा निवडणुकीत तीन जिल्हय़ातील १५ विधानसभा मतदारसंघातून ११७ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केलेली मतांची गोळाबेरीज हे अपक्ष बिघवडतात का, या दृष्टीने राजकीय विश्लेषक पाहत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारिप-बहुजन महासंघ या राजकीय पक्षात यावेळी बंडखोरी झाली आहे.वाशिम जिल्हय़ातील कारंजा या मतदारसंघातील प्रकाश डहाके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत; परंतु यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात शड्ड ठोकला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघा तील राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. वाशिम या विधानसभा मतदारसंघातून महिला काँग्रेसच्या पदाधिकारी डॉ. अल्का मकासरे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. अकोला पूर्व या विधानसभा मतदारसंघात भारिप-बमसंच्या नेत्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष पुष्पा इंगळे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या मतावर येथील भारिप-बमसंच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख विजय मालोकार या मतदारसंघात पुन्हा अपक्ष लढत आहेत. या अगोदर दोनवेळा या मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. याच मतदारसंघातून भाजपाचा घटक पक्ष असलेल्या रिपाइं (आठवले) गटाचे अशोक नागदेवे निवडणूक रिंगणात आहेत. मूर्तिजापूर या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीप्रमुख प्रतिभा अवचार अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. बाळापूर या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते नारायण गव्हाणकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. ते कुणबी समाजाचे असून, या मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. बुलडाणा जिल्हय़ातील बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शहरप्रमुख भगवान बेंडवाल यांनी शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश बाहेकर अपक्ष म्हणून रिंगणात आहे त. ते राकाँचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातून सेवानवृत्त कार्यकारी अभियंता रमेश घोलप यांनी अ पक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ते बारी समाजाचे असून, या मतदारसंघात बारी समाजाची लक्षणीय मते आहेत. या सर्व अपक्षामुळे राजकीय पक्षांचे उमेदवार धास्तावले असून, हे अपक्ष निवडून येतात की, राजकीय पक्षांच्या उमेदवाराचे गणित बिघडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.