शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा मोर्चा

By admin | Updated: July 13, 2017 20:16 IST

अकोला : प्रलंबित मागण्यांसाठी ईपीएस-९५ पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रलंबित मागण्यांसाठी ईपीएस-९५ पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका येथून दुपारी १२ वाजता हा मोर्चा निघून भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन मागण्यांचे निवेदन आयुक्त गिरिराज शर्मा यांना देण्यात आले. यावेळी आयुक्त गिरिराज शर्मा यांनी पेन्शनधारकांच्या मागण्या शासनाकडे पाठवून आलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, तसेच येत्या नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था बँकांमध्येच करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी कामगार नेते देवराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. राजेंद्र भातुलकर, एम. टी. इंगळे, गोपाल मांडेकर, मुकुंद गावंडे, डी. बी. भुसे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक रमेश गायकवाड यांनी केले. मोर्चात अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांमधून आलेले पेन्शनधारक सहभागी झाले होते. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी हिवराळे, शर्मा, पंत, देशमुख, कुटे, गणगणे, देवरे, दही, आढाव, व्यवहारे, मारोडे, अंधारे, काळे, फिरगे, भराटे, अंबादास ठाकरे, आर. एन. राऊत आदींनी सहकार्य केले.या आहेत मागण्या- महिना ६५०० रुपये पेन्शन व महागाई भत्ता.- कोशियारी समितीच्या शिफारशी अंतरिम वाढ म्हणून लागू करा.- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा.- वेटेज पेमेंट पूर्ण करा.- विधवांना पतीच्या वेटेजची रक्कम द्या.- विकलेल्या पेन्शनची १०० महिन्यांमध्ये भरपाई करा.- पेन्शनधारकांना सरकारी खर्चाने ई.एस.आय. लागू करा.- पेन्शनधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्या.- पेन्शन खात्याला झीरो बॅलेन्सची सुविधा सुरू ठेवा.