शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदल ठरताहेत घातक!

By admin | Updated: July 12, 2017 19:57 IST

‘सर्वोपचार’मध्ये रुग्णांची संख्या वाढली : ताप, सर्दी, खोकल्याचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वातावरणात दिवसागणिक होणारे बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. पावसाळ्याचे दिवस असतानाही दुपारी तापणारे ऊन आणि सकाळ व सायंकाळी खेळणारी थंड हवा, अशा टोकाच्या वातावरणाचा अनुभव येत असल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून, सर्वोपचार रुग्णालयासह लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या विषाणुजन्य आजारासह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गत आठवड्यापासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश भागात डबके साचले आहे, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. पावसाने दडी मारल्याने ऊनदेखील तापत आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर थेट जाणवू लागला आहे. हात-पाय दुखणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, ताप येणे, सर्दी, खोकला या प्रकारची लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. सर्वाेपचार रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. ही लक्षणे सामान्य वाटत असली, तरी डेंग्यू, डायरियासह स्वाइन फ्लूचीदेखील प्राथमिक लक्षणे आहेत. त्यामुळे कुठल्याही दुखण्याला साधारण समजून न टाळता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. जलजन्य आजार वाढले!पावसाळ्यात जलस्रोत दूषित होणे ही एक सामान्य बाब आहे. हे दूषित जल पिण्यामुळे जलजन्य आजार बळावले आहेत. सर्वोपचार रुग्णालयात अतिसाराचे अनेक रुग्ण दाखल आहेत. पावसाळ्यात उकळलेले पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.उघड्यावरील पदार्थ टाळा!पावसाळ्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. अशा वातावरणात उघड्यावर विकल्या जाणारे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. उघड्यावरील पदार्थांवर वातावरणातील रोगजंतू, धूळ बसते, त्यामुळे असे पदार्थ टाळायला हवे.सर्वोपचार रुग्णालयात दाखल रुग्णअतिसार- ३७ रूग्णटायफाइड - ०७ रूग्णमेनेंजायटीस - ०१ रूग्णगॅस्ट्रो - ०६ रूग्णताप - २० रूग्ण