शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उद्योजकांना मिळू शकतो कंपोझिशन स्कीमचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:33 IST

जीएसटी कंपोझिशन स्कीमच्या लाभास   मुकलेल्या अकोल्यातील पाचशे उद्योजकांना आणि  त्यांच्या  कर सल्लागारांना दिलासा मिळण्याची शक्यता  आहे. आगामी ९ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषद  सदस्यांची बैठक दिल्लीत होत असून, या बैठकीत कं पोझिशन स्कीमपासून तर जीएसटीतील अनेक त्रुटींवर  चर्चा आणि दुरुस्ती होणार आहे.

ठळक मुद्दे परिषदेच्या आजच्या बैठकीत होऊ शकतो निर्णयदोन दिवस हेल्प डेस्क चालणार बारा तास 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जीएसटी कंपोझिशन स्कीमच्या लाभास   मुकलेल्या अकोल्यातील पाचशे उद्योजकांना आणि  त्यांच्या  कर सल्लागारांना दिलासा मिळण्याची शक्यता  आहे. आगामी ९ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषद  सदस्यांची बैठक दिल्लीत होत असून, या बैठकीत कं पोझिशन स्कीमपासून तर जीएसटीतील अनेक त्रुटींवर  चर्चा आणि दुरुस्ती होणार आहे. अकोल्यासह देशभरातील हजारो उद्योजक कंपोझिशन  स्कीमपासून वंचित राहिलेत. जीएसटी परिषदेने देशभरा तील परिस्थितीचा आढावा घेत तारीख वाढवून द्यावी,  अशी मागणी जीएसटीच्या पोर्टलवर नोंदविली गेली.  जुलै महिन्यापासून देशभरात जीएसटीची  अंमलबजावणी सुरू झाली. एकाच सर्व्हरवर लोड येत  असल्याने अनेकांचे रिटर्न फाइल झाले नाहीत.  दरम्यान, जीएसटीने कंपोझिशन स्कीमचा लाभ  घेण्यासाठी १६ ऑगस्ट ही शेवटची तारीख ठरली.  त्यामुळे अनेकांना कंपोझिशन स्कीमचा लाभ घेता  आला नाही. पोर्टलच्या तक्रारी आणि मुंबईतील ऑल  इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सच्या निवेदनाची  दखल परिषद काही विशेष निर्णय घेण्याची शक्यता  आहे. ९ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या सदस्यांची  बैठक होणार आहे. या बैठकीत जीएसटीत आलेल्या  त्रुटी आणि बदल यावर ठोस निर्णय घेतले जाणार आहे त. त्यामुळे कंपोझिशन स्कीममध्ये मोठी संख्या  असल्याने त्यांना न्याय मिळण्याची शक्यता असल्याचे  बोलले जाते. ७५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल  करणार्‍या उद्योग आणि लहान कंपनी, कारखानदारांना  १ ते ५ टक्के कर भरून या स्कीमचा फायदा घेता येतो.  तिमाही रिटर्न भरणार्‍या या उद्योजकांना याचे क्रेडिट  मिळणार नाही. आता ९ सप्टेंबरच्या बैठकीत काय हो ते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दोन दिवस हेल्प डेस्क चालणार बारा तास वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संदर्भातील  भरणासंदर्भात येणार्‍या तक्रारींचा निवाळा करण्यासाठी  आता जीएसटी परिषदेच्या निर्देशान्वये राज्यभरात हेल्प  डेस्क उघडण्यात आले आहे. हे हेल्प डेस्क सकाळी  नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत विशेष सेवा देणार आहे.  बारा तास सेवा देणार्‍या हेल्प डेस्कसाठी पूर्वीचे  विक्रीकर अधिकारी लागले असले, तरी उत्पादन  शुल्कचे अधिकारी मात्र अजूनही या सेवेपासून नामा  निराळे आहेत. जीएसटीच्या अंमलबजावणीपासून तर  जीएसटीचा भरणा करेपर्यंत अजूनतरी उत्पादन  शुल्काची भूमिका अकोल्यात दिसलेली नाही. आता  दोन दिवसांच्या बारा तासांच्या या सेवेसाठी कार्यालयीन  शिवाय अतिरिक्त वेळ द्यावा लागणार आहे. यातील  अनेक समस्या अशा आहेत की, जीएसटी अधिकारी  स्थानिक पातळीवर त्या सोडवू शकत नाहीत. मात्र,  अधिकार्‍यांना केवळ जीएसटी कार्यालयात बसवून  ठेवण्याच्या सूचना वरिष्ठांकडून येत असल्याने  अधिकारी वर्ग कमालीचा वैतागला आहे.