शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश समिती सदस्यांच्याच कॉलेजकडून लूट!

By admin | Updated: July 13, 2017 01:54 IST

पालकांची तक्रार: अतिरिक्त शुल्काची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने प्रवेश अर्जामध्येच शिक्षण शुल्क निर्धारित केले असतानाही शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालये पैसे कमाविण्याच्या लालसेने निर्धारित शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीतील सदस्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांकडूनच विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरवर्षी अकरावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करण्यात येत होती. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्याची मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन यंदा अकोला शहरातील ५४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय; परंतु आॅफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी मंजुरी मिळवून दिली. यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने प्रवेशासंदर्भातील नियोजन करून विज्ञान शाखा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षण शुल्क निर्धारित केले. या शिक्षण शुल्कानुसारच कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी करण्याससुद्धा समितीने बजावले होते. या समितीमध्ये असलेल्या तीन ते चार सदस्यांचे स्वत:चे कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या समिती सदस्यांच्याच महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट करण्यात येत आहे. समितीने शिक्षण शुल्क निर्धारित केल्यानंतरही समिती सदस्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालयांकडून शिक्षण शुल्काव्यतिरिक्त वेगवेगळ्या नावांखाली विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. समिती सदस्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची लूट होत असेल, तर इतर कनिष्ठ महाविद्यालयांमधील काय परिस्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची लूट थांबवावी. अशी मागणी पालकांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे केली आहे. शहरातील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय अकरावी प्रवेशासाठी निर्धारित शिक्षण शुल्कापेक्षा अधिक शुल्काची मागणी करीत असेल, तर तो नियमाचा भंग आहे. पालक, विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी. अधिक शुल्क घेणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश रद्द केले जातील. पालकांनी न घाबरता तक्रार द्यावी. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी