शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात करा पर्यावरणाचे संवर्धन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:11 IST

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या श्री  गणेशाचे आगमन शुक्रवार, २५ ऑगस्टला मोठय़ा उत्साहात  होणार आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांनी बाप्पांच्या  आगमनाची खास तयारी केली आहे. यावर्षी बारा दिवस  चालणार्‍या या उत्सवाची सारेच जण मोठय़ा उत्साहाने तयारी कर तात; मात्र हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे संवर्धन होणे  गरजेचे आहे.

ठळक मुद्देघरोघरी बसवा इको फ्रेंडली बाप्पासजावटही हवी पर्यावरणपूरक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या श्री  गणेशाचे आगमन शुक्रवार, २५ ऑगस्टला मोठय़ा उत्साहात  होणार आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांनी बाप्पांच्या  आगमनाची खास तयारी केली आहे. यावर्षी बारा दिवस  चालणार्‍या या उत्सवाची सारेच जण मोठय़ा उत्साहाने तयारी कर तात; मात्र हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे संवर्धन होणे  गरजेचे आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविल्या जाणार्‍या  गणेशमूर्तींसाठी रंगही रासायनिकच वापरले जातात. बाप्पांच्या  विसर्जनानंतर विहिरी, तलाव, नद्यांमधील पाणी दूषित होते. ही  गोष्ट लक्षात ठेवून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची  गरज आहे. 

गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोडगणेशोत्सव साजरा करताना गणेशभक्तांना पर्यावरणाचा विसर पड तो. दरवर्षी हजारो टन प्लास्टर, रासायनिक रंग, निर्माल्य पाण्यात  मिसळून प्रदूषणात भरच पडते. गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची  जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे.  त्याकरिता इको  फ्रेंडली मुर्तींबरोबरच सजावटीकरिताही इको फ्रेंडली आरास तयार  करता येते. या पर्यायाचा वापर करून सण, उत्सव साजरे करताना  होणारा पर्यावरणाचा र्‍हास टाळता येईल.

शाडू मातीच्या गणपतीला मागणीअलीकडे पर्यावरणाबाबत जनजागृती होत असल्याने घरगुती  गणेशाची स्थापना करताना तो शाडूच्या मातीचाच घेण्याकडे  लोकांचा कल वाढला आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरात पर्यावरण प्रेमी संस्था व संघटनांकडून शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे  प्रशिक्षण देणार्‍या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामुळे  लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती झाली आहे.

सजावटीसाठी कृत्रिम फुलांच्या माळासजावटीसाठीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. कृत्रिम  फुलांच्या माळा ६0 रुपयांपासून २00 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.