शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुक्यातील हळद जाणार इंग्लडला!

By admin | Updated: December 13, 2014 00:00 IST

५00 टन होणार निर्यात; करार प्रक्रिया प्रारंभ.

राजरत्न सिरसाट/अकोला स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीसोबतच नवीन प्रयोगही करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी तीनशे हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. या हळदीत कुरकमीनचे प्रमाण अधिक असल्याने दोन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ही हळद खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्यापैकी इंग्लड येथील कंपनीशी कराराची प्रक्रिया सुरू झाली असुन, या कराराद्वारे पातूरची पाचशे टन हळद आता थेट इंग्लडला निर्यात होणार आहे. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून स्पर्धाक्षम कृषी प्रकल्प कार्यक्रमातंर्गत राज्यात शेतकर्‍यांचे गट आणि उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेस वेग आला आहे. पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत जवळपास शंभर कंपन्या स्थापन होण्याच्या मार्गावरू न असून, पंधराहून अधिक कंपन्या बुलडाणा जिल्ह्यात स्थापन झाल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी पारंपरिक पिकांसह, पिकांचे काही नवीन प्रयोगही करीत आहेत. अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी बटाटा, ढोबळी मिरची, बेबी कॉर्न, कसुरी मेथी, टरबूज आदी पिकांवर लक्ष केंद्रित केले असून, हा शेतमाल थेट कंपन्यांना विकला जात आहे. त्यासाठी करार करण्यात आल्याने या कंपन्या थेट शेतात येऊन शेतमाल खरेदी करीत आहेत. याच पद्धतीचा प्रयोग पातूर तालुक्यातील हळद उत्पादक शेतकर्‍यांनी केला आहे. या तालुक्यात जवळपास तीनशे हेक्टर क्षेत्रावर सेलम जातीच्या हळदीची लागवड करण्यात आली आहे. या हळदीमध्ये कुरकमीनचे प्रमाण अधिक आहे. मसाल्यासाठी उपयुक्त घटक आणि इतर आरोग्यदायी, औषधी गुणधर्मही हळदीमध्ये आहेत. म्हणूनच इंग्लडच्या एका कंपनीने टरफलाच्या हळदीची मागणी केली आहे. पातूरच्या शेतकरी गटाच्या श्रमिक भारती अँग्रोप्रोड्युस कंपनीने हळदीची निर्यात करण्याचा निणर्य घेतला आहे. त्यासाठी करार प्रक्रियाही प्रारंभ केली आहे. निर्यातीसाठी या कंपनीने हळद मळणी यंत्र लावण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच ही यंत्रणा सुरू केली जाणार आहे. *हेक्टरी अडीचशे क्विंटल उत्पादन ओल्या हळदीचे उत्पादन हेक्टरी २५0 क्विंटल असून, वाळलेल्या हळदीचे हेक्टरी ६0 क्विंटल उत्पादन मिळते. या हळदीचे भाव राज्यातील बाजारपेठेत प्रतिक्विंटल सहा हजार ते सहा हजार पाचशेपर्यंत आहेत. आंतराष्ट्रीय कंपनी एकाच वेळी पाचशे टन हळद खरेदी करणार आहे.