शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बालकाच्या मृत्यूप्रकरणी महावितरण अभियंता निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:01 IST

जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ८ नोव्हेंबर रोजी त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला व महेबूब शाह हे गंभीर जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: तालुक्यातील नवसाळ येथे रहिवासी साहील शहा अय्युब शाह हा गावातील महेबूब शाह यांच्या सोबत बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. बकºया चारत असताना बालकाचा लोंबकळलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ८ नोव्हेंबर रोजी त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला व महेबूब शाह हे गंभीर जखमी झाले.या प्रकरणी माना पोलिसांनी अभियंता खंडारे व लाइनमन विजय बनसोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विजय बनसोड याला पोलिसांनी अटक केली असून, घटनेला जबाबदार असलेला अभियंता फरार झाला आहे. या प्रकरणी शाखा अभियंता खंडारे व वायरमन विजय बनसोड यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. नवसाळ येथील साहील शाह अय्यूब शाह हा १५ वर्षीय बालक गावातील मेहबूब शाह या वृद्धासोबत बकºया चारण्यासाठी रानात गेला होता. दृष्टीस न पडलेल्या ११ केव्हीच्या विद्युत पोलच्या लोंबकळलेल्या ताराला स्पर्श झाल्याने साहील हा जागीच गतप्राण झाला व ७० वर्षीय महेबूब शाह गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी माना पोलिसात जामठी सर्कलचे शाखा अभियंता खंडारे व वायरमन विजय बनसोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनाक्रम लक्षात घेता जखमींना न्याय मिळावा म्हणून महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी निवेदन सादर करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. तथापि, ९ नोव्हेंबर रोजी शाखा अभियंता खंडारे व वायरमन विजय बनसोड यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणातील दोन्ही फरार आरोपीपैकी वायरमन विजय बनसोड याला माना पोलिसांनी ११ नोव्हेंबर अटक केली आहे. सदर घटनेतील मुख्य आरोपी अद्यापही फरार असून आरोपीचे मोबाइल ट्रेस करणे सुरू असून, सध्या शिमला येथे लोकेशन मिळत असल्याचे माहिती आहे. या प्रकरणातील महावितरणच्या दोषी अधिकाºयाला अटक करण्यात यावी म्हणून वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरmahavitaranमहावितरण