शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: April 28, 2017 02:04 IST

खेट्री : नजीकच्या गावंडगाव येथील महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चान्नी पोलिसांनी २६ एप्रिल रोजी मृतक महिलेच्या पतीसह सासरच्या एकूण चौघे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खेट्री : नजीकच्या गावंडगाव येथील महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चान्नी पोलिसांनी २६ एप्रिल रोजी मृतक महिलेच्या पतीसह सासरच्या एकूण चौघे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गावंडगाव येथील मेनका संजय राठोड (२६) ही १७ एप्रिल रोजीच्या रात्री १० वाजता घराजवळ विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात आहे, असे सांगून गेली होती. ती रात्री उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने पतीसह घरातील इतर लोकांनी तिचा गावात शोध घेतला असता मृतदेह विहिरीत आढळून आला. त्यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मृतक महिलेचे वडील रामेश्वर सावजी जाधव रा. शिर्ला नेमाने ता. खामगाव यांनी तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार चान्नी पोलिसांत नोंदविली. सदर तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी मेनकाचा पती संजय राठोड, नणंद शोभा राठोड, नंदोई बंडू पवार व सिंधु पवार, या चौघे जणांविरुद्ध भांदविच्या ४९८ (अ), ३०६, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.