शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सिंधी कॅम्प मार्गावरील अतिक्रमण हटविले!

By admin | Updated: April 24, 2017 01:40 IST

अकोला : स्थानिक सिंधी कॅम्प आणि खदान मार्गावरील अतिक्रमण रविवारी हटविण्यात आले. अकोला महापालिका अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई रविवारी केली.

अकोला : स्थानिक सिंधी कॅम्प आणि खदान मार्गावरील अतिक्रमण रविवारी हटविण्यात आले. अकोला महापालिका अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई रविवारी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये आणि मार्ग रुंदीकरणाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सातत्याने केली जात आहे. अतिक्रमण हटाव मोहीम रविवारपासून पुन्हा तीव्र झाल्याने महानगरातील अतिक्रमकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. आता महापालिकेची मोहीम कुणीकडे वळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खदानच्या शासकीय गोदामाजवळच्या आणि जेतवन नगर चौकापर्यंतच्या रस्त्याच्या नालीवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेले होते. सदर अतिक्रमण काढण्यासाठी अनेकदा नोटिस बजाविण्यात आल्या; मात्र अतिक्रमकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने रविवारी ही धाडसी कारवाई केली. सिंधी कॅम्प चौकातील झुलेलाल पाणपोई या पथकाने जमीनदोस्त केली. पोलीस प्रशासन आणि परिसरातील नागरिकांनीदेखील महापालिका प्रशासनास स्वयंस्फूर्तीने सहकार्य केले. महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या निर्देशान्वये उपायुक्त समाधान सोळंके, पोलीस निरीक्षक शेख, चव्हाण, खांडेकर, झोन अधिकारी राजेंद्र घनबहादूर, संदीप गावंडे, श्याम बगेरे, राजेंद्र टापरे, संजय थोरात, विजय बडोणे, अ‍ॅड. इंगोले यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. गाळेही काढले!शासकीय कार्यालयालगत बांधलेले व्यापारी संकुलचे अतिक्रमित गाळे काढले गेले. या मार्गावर केलेले अतिक्रमण आणि रस्त्यावरील धार्मिक स्थळ काढल्या गेल्याने परिसरात बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या मार्गावरील महान पुरुषांचे पुतळेही कारवाईत काढण्यात आले.