शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हिस लाइनमध्ये अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:16 IST

टॅक्सची माेहीम थंडावली अकाेला : अकाेलेकरांकडे १३८ काेटींचा मालमत्ता कर थकीत असून, त्याची वसुली करण्यासाठी मध्यंतरी महापालिका प्रशासनाने १४८ ...

टॅक्सची माेहीम थंडावली

अकाेला : अकाेलेकरांकडे १३८ काेटींचा मालमत्ता कर थकीत असून, त्याची वसुली करण्यासाठी मध्यंतरी महापालिका प्रशासनाने १४८ पथकांचे गठन केले. मागील काही दिवसांपासून मनपाकडून टॅक्स वसुलीची माेहीम थंडावल्याचे चित्र असून, यामुळे नागरिकांनी सुद्धा कर जमा करण्यास हात आखडता घेतला असून, याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे.

खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

अकाेला : निमवाडी लक्झरी बसस्थानक ते पाेलीस मुख्यालयापर्यंतच्या मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. लक्झरी बसस्थानकामुळे येथे प्रवाशांची माेठी रेलचेल राहते. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता लक्षात घेता या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शनाचा अभाव

अकाेला : खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता रब्बी हंगामातील पिकांवरही विविध किडराेगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज असताना या विभागाकडून पाठ फिरविल्याचे चित्र समाेर आले आहे.

वातावरणात बदल : साथ राेगांचा फैलाव

अकाेला : शहरात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, थंडीचा कडाका वाढला आहे. याचा परिणाम लहान मुले व वयाेवृद्ध नागरिकांच्या आराेग्यावर झाला आहे. शहरातील सर्व खासगी दवाखाने रुग्ण संख्येने खच्चून भरल्याचे चित्र आहे.

फिजिकल डिस्टन्सिंगला खाे

अकाेला : शहरात थंडीचा कडाका वाढत चालला असतानाच काही दिवसांपासून काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ हाेत असल्याचे समाेर आले आहे. काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून फिजिकल डिस्टन्सिंगकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे.

जय हिंद चौकात वाहतुकीचा खाेळंबा

अकोला : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या जय हिंद चौकात साेमवारी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. मुख्य रस्त्यालगत ऑटाेचालकांसह खाद्यपदार्थ, फळविक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली हाेती. जुने शहरात अरुंद रस्त्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागताे.

डासांची पैदास वाढली

अकोला : शहरातील नाले-गटारांची नियमित साफसफाई होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले असून, डांसाच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या हिवताप विभागाने धुरळणी करण्याची गरज आहे. या विभागाचा बेताल कारभार अकाेलेकरांच्या मुळावर उठला आहे.

राष्ट्रीय मार्गावर मातीचे ढीग

अकोला : शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण कार्य वेगाने सुरू असले तरी रस्त्याच्या खाेदकामात निघणाऱ्या मातीची शहराबाहेर विल्हेवाट न लावता रस्त्यालगत मातीचे ढीग लावल्या जात असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर वाहनांमुळे दिवसभर मातीचा धुराळा उठत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.