शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील २० कोटींच्या ‘एलईडी’ला अतिक्रमणाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 13:39 IST

अकोला : शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांमध्ये ‘एलईडी’ पथदिव्यांची उभारणी करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर २० कोटींची कामे केली जात आहेत.

ठळक मुद्देमुख्य मार्ग वगळल्यास इतर रस्ते व चौकांमध्ये एलईडी पथदिवे लावताना अतिक्रमणाचा अडथळा निर्माण होत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास शहरात पथदिवे उभारणीचे काम तब्बल ४० टक्क्यांनी प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.

अकोला : शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांमध्ये ‘एलईडी’ पथदिव्यांची उभारणी करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर २० कोटींची कामे केली जात आहेत. बोटावर मोजता येणारे मुख्य मार्ग वगळल्यास इतर रस्ते व चौकांमध्ये एलईडी पथदिवे लावताना अतिक्रमणाचा अडथळा निर्माण होत आहे. यामध्ये स्थानिक रहिवासी, दुकान व्यावसायिकांचा समावेश आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास शहरात पथदिवे उभारणीचे काम तब्बल ४० टक्क्यांनी प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत शहरातील मुख्य रस्ते असो वा अंतर्गत रस्त्यांवर सोडियम पथदिव्यांचा वापर केला जात होता. सोडियम पथदिव्यांमुळे मनपाच्या वीज देयकात प्रचंड वाढ होत असल्याची सबब पुढे करीत २००६ मध्ये ‘सीएफएल’ पथदिव्यांना प्राधान्य देण्यात आले. यासाठी प्रशासनाने एशियन नामक कंपनीसोबत २०१३ पर्यंत सीएफएल पथदिव्यांसाठी करारनामा केला होता. दुसरीकडे सीएफएलच्या अंधुक उजेडामुळे अकोलेकर हैराण झाले होते. कंपनीचे देयक थकीत राहत असल्यामुळे कंपनीनेसुद्धा पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी आखडता हात घेतला. यावर उपाय म्हणून एलईडी पथदिवे लावण्यासाठी आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडे निधीची मागणी केली. गतवर्षी एलईडीसाठी शासनाने १० कोटींचा निधी मंजूर केला. त्यामध्ये मनपा प्रशासनाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटींची तरतूद करीत एकूण २० कोटी रुपयांतून एलईडी पथदिव्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविली. शहरात रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश आहे. बोटावर मोजता येणारे मुख्य रस्ते वगळल्यास इतर ठिकाणी एलईडी लाइट लावण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याचे चित्र समोर येत आहे. स्थानिक नागरिकांनी बांधलेली घरे, ओटे, टिनाचे शेड, दुकानांचे पक्के अतिक्रमण थेट रस्त्यावर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी पथदिवा उभारणार कसा, असा प्रश्न कंपनीसमोर निर्माण झाला आहे. तर ४० टक्के काम होणारच नाही!शहरातील प्रमुख ११० चौकांत हायमस लाइट उभारल्या जात आहेत. प्रमुख ५० रस्त्यांपैकी काही रस्त्यांवर नागरिकांची दुकाने, टिनाचे शेड, ओटे बांधल्याचे दिसून येते. दोन पथदिव्यांमधील अंतर निकषानुसार असणे अपेक्षित असताना संबंधित अतिक्रमकांची समजूत काढताना कंपनीच्या नाकीनऊ आले आहेत. पथदिवे उभारणीच्या आड येणारे अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास ४० टक्के काम होणारच नसल्याची माहिती आहे.निधी प्राप्त; अंमलबजावणीचे काय?शहराच्या विविध भागात २० कोटी रुपयांतून लख्ख उजेड देणारे एलईडी पथदिवे उभारणीचे काम सुरू आहे. मध्यंतरी पथदिव्यांसाठीच आ. गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला असता मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. शहरात एलईडी पथदिव्यांसाठी शासनाकडून निधी प्राप्त होत असला, तरी अंमलबजावणीचे काय, याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका