शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

अकोला शहराला अतिक्रमणाचा विळखा; महापौरांचा आदेश विरला हवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 13:48 IST

अतिक्रमण विभागासह नियंत्रण ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशाला पायदळी तुडविल्याचे समोर आले असून, शहरात सर्वत्र अतिक्रमकांनी चक्क रस्त्यांवर बाजार मांडल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले.

ठळक मुद्देप्रचंड गर्दीमुळे अकोलेकरांना मुख्य बाजारपेठेतून चालताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. मुख्य रस्त्यांवर ठाण मांडणाºया अतिक्रमकांकडे महापालिका प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’दुर्लक्ष होत असल्यामुळेच अतिक्रमकांच्या दादागिरीने उचल खाल्ली आहे.अतिक्रमणाचा अकोलेकरांना त्रास झाल्यास हेच पदाधिकारी महापालिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हे विशेष.

अकोला: शहरातील अतिक्रमण आठ दिवसांत न हटविल्यास अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ न देता सेवा बंद करण्याचा इशारा सर्वसाधारण सभेत महापौर विजय अग्रवाल यांनी दिला होता. अतिक्रमण विभागासह नियंत्रण ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशाला पायदळी तुडविल्याचे समोर आले असून, शहरात सर्वत्र अतिक्रमकांनी चक्क रस्त्यांवर बाजार मांडल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले. हा प्रकार लक्षात घेता महापौर विजय अग्रवाल त्यांच्या इशाऱ्यानुसार कारवाई करतात की सभागृहात घेतलेला निर्णय मागे फिरवतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून गांधी रोड, टिळक रोड, जुना कापड बाजार आदी भागांकडे पाहिल्या जाते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून ते रेडिमेड कपड्यांसह विविध वस्तूंची दुकाने या परिसरात आहेत. प्रचंड गर्दीमुळे अकोलेकरांना मुख्य बाजारपेठेतून चालताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. मुख्य रस्त्यांवर ठाण मांडणाºया अतिक्रमकांकडे महापालिका प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’दुर्लक्ष होत असल्यामुळेच अतिक्रमकांच्या दादागिरीने उचल खाल्ली आहे. मनपाच्या आवारभिंतीलगत ‘पार्किंग’साठी जागा राखीव असताना अतिक्रमण विभागाच्या नाकावर टिच्चून रेडिमेड कापड व्यावसायिक दुकाने थाटतात. सणासुदीच्या दिवसांत अतिक्रमकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गळ काही राजकीय पदाधिकाºयांकडून घातली जाते. त्याचवेळी अतिक्रमणाचा अकोलेकरांना त्रास झाल्यास हेच पदाधिकारी महापालिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हे विशेष.महापौरांच्या निर्णयाकडे लक्षमनपाच्या अतिक्रमण विभागाचे रस्त्यावर दुकाने मांडणाºया अतिक्रमकांसोबत आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोप खुद्द महापौर विजय अग्रवाल यांनी ९ मे रोजीच्या सर्वसाधारण सभेत केला होता. या विभागातील मानसेवी कर्मचाºयांनी अतिक्रमण दूर न केल्यास त्यांची सेवा बंद करण्याचा गर्भीत इशारा महापौरांनी दिला होता. महापौरांच्या इशाºयानंतर गेंड्याची कातडी असलेल्या या विभागाने व नियंत्रण अधिकाºयांनी कोणतीही ठोस भूमिका बजावली नसल्यामुळे अतिक्रमणाची समस्या कायमच असल्याचे चित्र आहे. यावर महापौर काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अतिक्रमण विभागाची मुजोरी कायमगांधी चौकातील अतिक्रमणाला मनपाचे अभय गांधी चौकातील एका कमर्शियल कॉम्प्लेक्सच्यावतीने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली चक्क रस्त्यावरच पेव्हर ब्लॉक उभारून त्याला ग्रिल लावली आहे. पेव्हर ब्लॉक बसवताना मनपाचे सर्व निकष, नियम पायदळी तुडवत गांधी चौकातील थेट मुख्य रस्त्याचा वापर करण्यात आला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला लघु व्यावसायिक त्यांच्या हातगाड्या लावून व्यवसाय करत असल्यामुळे मुख्य रस्त्यावरून चालावे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.पार्किंगच्या जागेवर व्यवसाय कसा?गांधी चौकातील दुर्गा देवीच्या मंदिरासमोरील जागा पार्किंगसाठी राखीव आहे. पार्किं गच्या जागेवर काही अतिक्रमकांनी व्यवसाय उभारल्याचे चित्रनेहमीच दिसून येते. हाच प्रकार पार्किंगसाठी राखीव असणाऱ्या इतरही जागेवर सर्रासपणे दिसून येतो. मनपाच्या अतिक्रमण विभागाचे याप्रकाराकडे दुर्लक्ष होतेच कसे, असा सवाल उपस्थित होतो.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका