शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहराला अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाला धोरणाला शासनाच्या ‘अ‍ॅप’ची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:30 IST

अकोला: शहरातील अतिक्रमणाची समस्या अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. रस्त्यालगत जागा दिसेल त्या ठिकाणी उघड्यावर अतिक्रमक बाजार मांडत असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.

अकोला: शहरातील अतिक्रमणाची समस्या अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. रस्त्यालगत जागा दिसेल त्या ठिकाणी उघड्यावर अतिक्रमक बाजार मांडत असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. अतिक्रमणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाकडून मोबाइल ‘अ‍ॅप’ विकसित केल्या जाणार असल्याने प्रशासनाने प्रसिद्ध केलेली फेरनिविदा तूर्तास बाजूला सारण्यात आल्याची माहिती आहे.शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमकांनी गिळंकृत केली आहेत. रेडीमेड ड्रेस विक्रेता, फळ विके्रता तसेच विविध साहित्याची विक्री करणाऱ्या लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी चक्क रस्त्यांवरच दुकाने थाटल्याचे चित्र आहे. शहरातील मोठी प्रतिष्ठाने, दुकानांसमोर लघू व्यावसायिक बाजार मांडत असल्यामुळे अनेकदा दोन्ही व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण होतात. शिवाय, व्यवसायावरसुद्धा परिणाम होतो. अतिक्रमणाचे लोन गल्लीबोळातदेखील पसरले असून, काही बहाद्दरांनी चक्क सर्व्हिस लाइनमध्ये भाजी विक्रीची दुकाने उभारली आहेत. मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाच्या समस्येमुळे नागरिकांना पायी चालणे मुश्कील झाल्याचे चित्र आहे. अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी मनपाच्या अतिक्रमण विभागाची असली, तरी हा विभाग अतिक्रमणाची समस्या दूर करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते. शिवाय, वारंवार अतिक्रमकांना हुसकावून लावल्या जात असल्याने त्रस्त झालेल्या अतिक्रमकांकडून फेरीवाला धोरण लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई महापालिकेसह इतर मोठ्या शहरांमध्ये फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नागरिकांना होणारा त्रास, विस्कळीत होणारी वाहतूक लक्षात घेता मध्यंतरी महापालिका प्रशासनाने फेरीवाला धोरणाच्या मुद्यावर सर्वेक्षणासाठी निविदा प्रसिद्ध केली होती.सत्ताधारी-प्रशासन उदासीनफेरीवाला धोरणानुसार उघड्यावर व्यवसाय करणारे लघू व्यावसायिक, फेरीवाले यांना ठरावीक जागेवर व्यवसाय उभारता येईल. गतवर्षी जागेचा आराखडा तयार करण्याचे काम प्रशासनाच्या स्तरावर सुरू झाले होते. शासनाच्या मोबाइल अ‍ॅपची प्रतीक्षा न करता संबंधित महत्त्वाची कामे मार्गी लावणे अपेक्षित असताना या मुद्यावर सत्ताधारी भाजपासह खुद्द प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे.

महापालिकेला ‘अ‍ॅप’ची प्रतीक्षा!शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालून त्यांना शिस्त लावण्यासाठी शासनाने फेरीवाला धोरणानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिकांना दिले आहेत. फेरीवाल्यांचा सर्व्हे करून त्यांना ओळखपत्र देणे व पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा यामध्ये समावेश आहे. त्यानुषंगाने शासन स्तरावर मोबाइल ‘अ‍ॅप’ विकसित केल्या जात असून, ते राज्यभरातील महापालिकांच्या सोयीचे ठरणार आहे. ‘अ‍ॅप’च्या निकषानुसार मनपाला पुढील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका