शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गालगतचे अतिक्रमण काढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 02:46 IST

राष्ट्रीय महामार्गावरील बोरगावमंजू शहरात जाणार्‍या महामार्गाच्या चौपदरीकरण व सौंदर्यीकरणास केंद्र सरकारने हिरवी झेंडी दिली आहे

बोरगावमंजू (अकोला), दि. २- राष्ट्रीय महामार्गावरील बोरगावमंजू शहरात जाणार्‍या महामार्गाच्या चौपदरीकरण व सौंदर्यीकरणास केंद्र सरकारने हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे, बस थांबा ते ग्रामसचिवालयापर्यंंंत महामार्ग हद्दीतील अतिक्रमणावर पुन्हा गजराज चालणार असून याआधी महामार्ग प्राधिकरणाने निश्‍चित केलेल्या पिवळ्या निशाणीपर्यंंंत तसेच ऑगस्ट २0१६ मध्ये अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमण हटविले होते, हे विशेष; परंतु व्यावसायिकांनी परत आपले व्यवसाय महामार्ग हद्दीत थाटले तर या अतिक्रमणावर परत गजराज फिरणार असून लवकरच शहरातून जाणार्‍या महामार्गाच्या चौपदरीकरणास प्रारंभ होईल, अशी विश्‍वसनीय सूत्रानुसार माहिती प्राप्त झाली आहे.भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण व रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय महामार्गाच्या विकासकामाचा मोहिमेचा एक भाग म्हणून अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) च्या माध्यमातून बोरगावमंजू शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चे कि.मी. २३0, ३00 ते कि.मी. ३३.४00 पर्यंंंत पेव्हड शोल्डरसहित चौपदरीकरण करून (ईपीसी) पद्धतीने सुधारण करण्याकरिता केंद्र सरकार व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांची संयुक्त चौपदरीकरण व सौंदर्यीकरण कामासाठी हिरवी झेंडी मिळाली आहे. सदर नियोजित शहरातून जाणार्‍या महामार्गाच्या चौपदरीकरणास प्रारंभ होईल. या चौपदरीकरणाचे काम महामार्गाच्या दोन्ही बाजूने होत असून सदर चौपदरीकरणाच्या अनुषंगाने ५ ऑगस्ट रोजी संबंधित बस थांबा ते ग्रामसचिवालयापर्यंंंत महामार्गाच्या हद्दीमधील व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले होते, हे विशेष. परत व्यावसायकांनी दोन्ही बाजूने महामार्ग हद्दीत येणार्‍या जागेवर व्यवसाय थाटले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणास लवकरच प्रारंभ होत असून शहरातील व्यावसायिकांच्या अतिक्रमित बांधकामावर गजराज चालणार, एवढे मात्र निश्‍चित आहे.