शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचा-यांच्या वेतनाची सोय झाली!

By admin | Updated: March 5, 2017 01:44 IST

एलबीटीचे ३ कोटी ९३ लाखांचे अनुदान प्राप्त

अकोला, दि. ४- महापालिका कर्मचार्‍यांचे पाच महिन्यांचे वेतन थकीत आहे. कर्मचार्‍यांसाठी दिलासा का होईना, एक महिन्याच्या वेतनाची सोय झाली असून, शासनाकडून एलबीटीच्या बदल्यात ३ कोटी ९३ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. उर्वरित रकमेचा जुगाड करून कर्मचार्‍यांना एक महिन्याचे वेतन अदा केले जाईल. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत मनपा कर्मचार्‍यांचे चार महिन्यांचे वेतन रखडले होते. वेतन अदा होईल एवढी रक्कम तिजोरीत नसल्यामुळे विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त कोट्यवधींच्या रकमेच्या बदल्यात बँकांमध्ये व्याजापोटी जमा ९ कोटी २६ लाख रुपये मंजूर करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने शासनाकडे लावून धरली होती. ऑक्टोबर २0१६ मध्ये परतफेडीच्या अटी-शर्ती ठेवून शासनाने ९ कोटी २६ लाखांची रक्कम मंजूर केली होती. त्यावेळी प्रशासनाने कर्मचार्‍यांचे थकीत वेतन अदा केल्यानंतर ऑक्टोबर ते फेब्रुवारी असे पाच महिन्यांचे वेतन पुन्हा रखडले. मे महिन्यानंतर मनपाच्या सुधारित मालमत्ता कर वसुलीला सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. त्यानंतर किमान दोन-तीन महिन्यांत वेतनाची समस्या निकाली निघेल, असा प्रशासनाला विश्‍वास आहे. असे असले, तरी मागील पाच महिन्यांचे वेतन रखडल्यामुळे कर्मचारी वैतागले आहेत. यावर तात्पुरता दिलासा का होईना, शासनामार्फत एलबीटीच्या बदल्यात ३ कोटी ९३ लाख रुपये अनुदान मनपाला प्राप्त झाले आहे. मनपाकडे असलेली उर्वरित रक्कम जमा करून कर्मचार्‍यांना एक महिन्याचे वेतन अदा केले जाणार आहे.