शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचार्‍यांचे काम बंद; ‘महसूल’चे कामकाज ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:29 IST

अकोला : विविध प्रलंबित मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचार्‍यांनी ‘एल्गार’ पुकारत मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हय़ात महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.

ठळक मुद्देकार्यालयांमध्ये शुकशुकाट! ३३८ कर्मचार्‍यांचा सहभाग!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विविध प्रलंबित मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचार्‍यांनी ‘एल्गार’ पुकारत मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हय़ात महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहायक असे करण्याचे मान्य करण्यात आले होते, त्यानुसार शासन निर्णय करण्यात यावा, नायब तहसीलदार पदाचा ‘ग्रेडपे’ ४८00 रुपये मान्य करण्यात आला होता. त्यासंदर्भात शासन निर्णय पारित करण्यात यावा, अव्वल कारकून संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करण्यात याव्या, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात यावा, पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदे पदोन्नतीची असल्याने पुरवठा निरीक्षकांची पदे सरळ सेवेतून भरण्यात येऊ नये, नायब तहसीलदार सरळसेवा भरती पदांचे प्रमाण ३३ टक्क्यांवरून २0 टक्के करण्यात यावे व पदोन्नतीने ८0 टक्के पदांचे प्रमाण मंजूर करण्यात आले.त्यानुसार शासन निर्णय पारित करण्यात यावा, आकृतिबंधात सुधारणा करण्याबाबत दांगट समितीने सादर केलेल्या प्रस्तावात लिपिक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार व इतर पदे वाढविण्यात आली असून, त्यामध्ये कपात न करता तातडीने मंजुरी देण्यात यावी, यासह प्रलंबित दहा मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने बेमुदत काम बंद आंदेलन सुरू करण्यात आले आहे. काम बंद आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय अंतर्गत अव्वल कारकून, कनिष्ठ लिपिक व शिपाई संवर्गातील महसूल कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्हय़ात महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. या आंदोलनात महसूल कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली. या आंदोलनात जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण इंगळे, सचिव राजेंद्र नेरकर, मंगेश पेशवे, नितीन निंबुळकर, वैजनाथ कोरकने, संतोष कुटे, सचिन भांबेरे, प्रशांत देशमुख, विशाल ढाकरगे, अविनाश डांगे, महेंद्र दामोदर, संदीप गावंडे, भूषण बोर्डे, योगेश खांदवे, प्रतीक जोशी, वर्षा भुजाडे, मेधा देशपांडे, उज्ज्वला सांगळे, वंदना वानखडे, रत्ना बाजारे, चारुशीला वाघमारे, अलका भांडे, शशिकांत फासे, नीलेश दामोदर, राहुल राठोड, शुभम यावलनकर, सतीश ढोले यांच्यासह जिल्हय़ातील महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.