शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

कर्मचा-यांचा आकृतिबंध नव्याने होणार !

By admin | Updated: September 13, 2016 03:08 IST

आयुक्तांच्या निर्देशानंतर अकोला महापालिकेचा सामान्य प्रशासन विभाग लागला कामाला.

आशीष गावंडे अकोला, दि. १२: महापालिकेच्या बिंदूनामावलीला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्यामुळे प्रशासनाचा सरळ सेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला होता. हद्दवाढीमुळे मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या तत्कालीन ग्रामपंचायतींमधील कर्मचार्‍यांना मनपाच्या आस्थापनेवर सामावून घ्यावे लागणार असल्याने आयुक्त अजय लहाने यांनी कर्मचार्‍यांचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश संबंधित विभागाला दिले असून हा आकृतीबंध मंजुरीसाठी सादर केला जाईल.मनपा प्रशासनाने २00४ पासून बिंदू नामावली अद्ययावत करण्याला ह्यखोह्ण दिला. ऑगस्ट २0१५ मध्ये अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस. थूल यांनी प्रशासनाला बिंदूनामावली अद्ययावत करण्याचे निर्देश दिले होते. सप्टेंबर २0१५ मध्ये आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार्‍या अजय लहाने यांनी सर्वप्रथम बिंदू नामावलीचा विषय हाती घेतला. अकरा वर्षांपासून बिंदू नामावलीचा विषय जाणीवपूर्वक थंड बस्त्यात ठेवल्याने तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांसह विविध पदांचा अनुशेष निर्माण झाला. परिणामी जलप्रदाय विभाग, बांधकाम विभाग, नगर रचना विभागाच्या माध्यमातून होणारी कामे प्रभावित झाली. घरकुल योजना असो वा विकासकामांची देखरेख, मानधनावरील कनिष्ठ अभियंत्यांवर कामाचा ताण पडत आहे. याशिवाय, नियमबाह्य पदोन्नतीद्वारे अनेक कर्मचार्‍यांनी महत्त्वाच्या पदांवर कब्जा केल्याने पदोन्नतीसाठी पात्र कर्मचार्‍यांवर अन्याय झाला. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. मनपाचा प्रशासकीय कारभार ताळ्य़ावर आणण्यासाठी बिंदूनामावली अद्ययावत करणे अत्यावश्यक असल्याचे लक्षात घेता, आयुक्त अजय लहाने यांनी बिंदूनामावलीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. या विभागाने प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. त्यावेळी सरळ सेवा पदभरतीच्या नामावलीला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली. सद्यस्थितीत हद्दवाढीमुळे मनपाच्या आस्थापनेत बदल होणार आहेत. त्यामुळे मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या तत्कालीन ग्रामपंचायतींमध्ये आस्थापनेवर कार्यरत ६१ कर्मचार्‍यांना मनपाच्या आस्थापनेवर सामावून घेतले जाईल. याकरिता आयुक्तांनी मनपाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आकृतिबंधाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर बिंदूनामावलीनुसार पदोन्नती प्रक्रिया व सरळ सेवा पदभरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल.    मनपाने जानेवारी महिन्यात बिंदूनामावलीचा प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांकडे सादर केला असता, सरळ सेवा पदभरतीच्या नामावलीला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली होती. तसेच पदोन्नती प्रक्रियेच्या बिंदू नामावली प्रस्तावाची छाननी सुरू केली होती. आयुक्तांच्या निर्णयामुळे पदोन्नती प्रक्रियेला आपसूकच ह्यब्रेकह्ण लागल्याचे दिसून येते. *पदभरतीचा आयुक्तांनाच अधिकार शासननिर्णयाप्रमाणे बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे भरण्याचा अधिकार मनपा आयुक्तांना असून, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन केले जाईल. त्यानंतर सरळ सेवा पदभरतीद्वारे तांत्रिक संवर्गातील पदे भरली जातील. *मनपाचे कामकाज प्रभावितजलप्रदाय विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभागातील तांत्रिक संवर्गातील पदे रिक्त असून उर्वरित मानसेवी कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढला आहे. संबंधित विभागांची स्थिती ह्यएक ना धड भाराभर चिंध्याह्णअशी झाल्यामुळे आयुक्तांनी किमान तांत्रिक संवर्गातील पदांसाठी मानधन तत्त्वावर पदभरती करण्याची नितांत गरज आहे.