शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या गाड्यांच्या सुट्या भागांवर कर्मचाऱ्यांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:58 IST

अकोला : जिल्हा परिषदेची वाहने वापरातून बाद करण्यापूर्वी त्यातील महागडे सुटे भाग स्वत:च्या वाहनासाठी वापरून हौस पूर्ण करण्याचा प्रकार भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या एचएच ३० ए २७६ या वाहनाबाबत घडला आहे.

अकोला : जिल्हा परिषदेची वाहने वापरातून बाद करण्यापूर्वी त्यातील महागडे सुटे भाग स्वत:च्या वाहनासाठी वापरून हौस पूर्ण करण्याचा प्रकार भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या एचएच ३० ए २७६ या वाहनाबाबत घडला आहे. एका कर्मचाºयाने या वाहनातील चारही टायर आणि इतर सुटे भाग आपल्या वाहनाला लावल्याची माहिती असून, त्याबाबत पाणी पुरवठा विभाग अनभिज्ञ आहे. चालक सेवानिवृत्त झाल्यानंतर ते वाहन नादुरुस्त असल्याचे दाखवून आता भांडारात ठेवण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात या वाहनासंदर्भात संपूर्ण माहिती नाही. ही बाब हेरून संबंधित कर्मचाºयाने या वाहनाच्या सुट्या भागावर डल्ला मारला. वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडून वाहन जिल्हा परिषदेच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे देण्यात आले. त्याची दुरुस्ती व देखभालीचा खर्च जिल्हा परिषदेकडे आहे; मात्र त्या वाहनाला वापरातून काढण्यापूर्वी अखेरचे टायर केव्हा लावण्यात आले, याची कोणतीच माहिती जिल्हा परिषदेत नाही. २०१२ मध्ये नवीन टायर खरेदी करून लावल्याचा जुजबी उल्लेख आहे. त्यापूर्वी २००८ मध्ये टायर बदलली. दरम्यान, पाणी पुरवठा विभागाने कंत्राटी तत्त्वावर नवी वाहने घेतली. त्यामुळे २०१७ अखेरपासून ते वाहन थांबलेले आहे. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये वाहन चालक अत्तरदे निवृत्त झाले. त्यांनी निवृत्त होण्यापूर्वी ते वाहन वाशिम बायपास परिसरातील भांडारात नेऊन ठेवले. दरम्यानच्या काळात विभागातील एका कर्मचाºयाने वाहनाचे चारही टायर गायब केले. त्यातील महागडे सुटे भाग काढून घेतले. ते सर्व स्वत:च्या वाहनाला जोडल्याची माहिती आहे. याप्रकरणी खातरजमा केली. चालकालाही माहिती विचारण्यात आली. त्यावरच पाणी पुरवठा विभाग शांत बसला तसेच वाहन वापरातून काढण्याची फाइल तयार झाली आहे. विभागातील संबंधित कर्मचाºयाने चौर्यकर्म प्रकार कोणाच्या मूकसंमतीने केले, ही बाब आता शोधाची झाली आहे. 

 

टॅग्स :Akola ZPअकोला जिल्हा परिषदAkolaअकोला