शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांचा संप सुरू

By admin | Updated: July 2, 2014 00:30 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांनी मागण्या पूर्ण न केल्यास या हंगामात पेरणीसह कोणतीच कामे करणार नसल्याचा इशारा कृषी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे.

अकोला : रोजंदारी मजुरांना योग्य मजुरी देण्यात यावी, ट्रॅक्टरचालक व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी २५ जूनपासून धरणे आंदोलन करणार्‍या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांनी मागण्या पूर्ण न केल्यास या हंगामात पेरणीसह कोणतीच कामे करणार नसल्याचा इशारा कृषी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे. कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती संशोधन केंद्र, वणीरंभापूर येथील मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्रासह सर्वच ब्लॉकवरील कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गत सात दिवसांपासून कृषी विद्यापीठाची प्रक्षेत्रावरील कामे ठप्प आहेत. ट्रॅक्टर, वाहनचालकांना ५00 रुपये, रोजंदारी मजुरांना नवीन रोजंदारी वेतनाप्रममाणे ३५0 रुपये देण्यात यावेत, जेव्हापासून नवीन मजुरी सुरू झाली तेव्हापासूनची थकबाकी देण्यात यावी, आठवड्याच्या आठवड्याला मजुरांना पगार देण्यात यावे, ३0 वर्ष काम करणार्‍या मजुरांना सेवेत कायम करावे, वाहनचालकांची भरती करताना ती केवळ कृषी विद्यापीठांतर्गतच करावी, नवीन प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्यात यावे, स्वइच्छेने काम सोडणार्‍या कर्मचार्‍यांना उपदानाची रक्कम लवकर देण्यात यावी, आदी मागण्यासाठी या कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मागण्या पूर्ण न केल्यास या हंगामात कोणतीच कामे करणार नसल्याचा इशारा या कर्मचार्‍यांनी दिला असला तरी, कृषी विद्यापीठ प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तूर्तास या विषयावर त्यांनी बोलण्याचे टाळले. (प्रतिनिधी)