शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड घोटाळा कारवाईबाबत कर्मचार्‍यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:57 IST

अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा  भूखंड हडप प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या शालू  घारपवार व हरिश्‍चंद्र कातडे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे,  यासाठी भूमी अभिलेख कर्मचार्‍यांनी आंदोलन करीत  काळय़ा फिती लावून कामकाज सुरू केले आहे.

ठळक मुद्देभूमाफियांची मोठी साखळी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा  भूखंड हडप प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या शालू  घारपवार व हरिश्‍चंद्र कातडे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे,  यासाठी भूमी अभिलेख कर्मचार्‍यांनी आंदोलन करीत  काळय़ा फिती लावून कामकाज सुरू केले आहे.अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट  नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड  शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी  प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0  कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भू खंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी  अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या  संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणका त ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपण्यात  आला आहे. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले  तसेच पाठपुरावा केला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस  ठाण्यातही तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानंतर  भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बी. डी. काळे यांनी  तीन कर्मचार्‍यांना निलंबित केले. यामध्ये शालू घारपवार व  हरिश्‍चंद्र कातडे यांच्यावर अन्याय झाला असून, त्यांचे  निलंबन मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी  आंदोलन सुरू केले आहे.

भूमाफियांची मोठी साखळीगजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे शहरातील आणखीही  भूखंड या साखळीने हडपल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे सदर प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नसतानाही  काही भूमाफिया, भूमी अभिलेखचे अधिकारी आणि  कर्मचारी जामिनासाठी धावपळ करीत आहेत, त्यामुळे या  भूमाफियांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यास शहरातील  शासकीय तसेच ओपन स्पेस आणि खुले भूखंड हड पणार्‍यांचा मोठा पर्दाफाश होणार असल्याचे तक्रारकर्त्याने  जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.  शासनाचा २0 कोटींचा भूखंड हडपल्यानंतरही हे भूमाफिया  काही बड्या हस्तींच्या आशीर्वादाने मोकाट असून,  त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून अटक करण्याची  मागणी तक्रारकर्ते डिकाव यांनी केली आहे.