शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्याचा मृत्यू; आर्थिक मदतीवरून मनपाची चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 15:43 IST

आर्थिक मदत देण्यावरून प्रशासनाने साधलेल्या चुप्पीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या महापाालिक ा कर्मचाºयाला आर्थिक मदत देण्यावरून प्रशासनाने साधलेल्या चुप्पीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कर्मचाºयाची हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आर्थिक मदतीसाठी मंगळवारी म्युनिसिपल मजदूर युनियनच्यावतीने पालकमंत्री ना. बच्चू कडू यांना साकडे घालण्यात आले.कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा १५ मार्चपासून कामाला लागली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, कोरोनाबाधित रुग्णांनी १००० चा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाच्या संकट काळात महापालिकेची संपूर्ण यंत्रणा एकदिलाने मुकाबला करीत असतानाच मनपाच्या जलप्रदाय विभागात कार्यरत एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाला कोरोना विषाणूची लागण होऊन त्याचा उपचारादरम्यान १४ जून रोजी मृत्यू झाला. मनपा कर्मचाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर येताच कर्मचाºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान, कोरोना विषाणूच्या काळात मनपा कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने व प्रशासनाने घेतला होता; परंतु सदर कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिक मदत देण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपसह प्रशासनाने चुप्पी साधल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता संबंधित कर्मचाºयाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या उद्देशातून मंगळवारी म्युनिसीपल मजदूर युनियनच्यावतीने पालकमंत्री ना. बच्चू कडू यांना निवेदन सादर करण्यात आले.

आर्थिक मदतीवर चुप्पी का?कोरोनामुळे मनपा कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजप व मनपा प्रशासनाने घेतला होता. सदर कर्मचाºयाचा १४ जून रोजी मृत्यू झाल्यानंतर जलप्रदाय विभागाने तशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठांकडे सादर करणे अपेक्षित होते. तसेच सत्ताधारी पक्षानेसुद्धा या संदर्भात प्रशासनाला पत्राद्वारे निर्देश देणे क्रमप्राप्त होते. तसे अद्यापही झालेच नसल्याने सत्तापक्षासह प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

विमा कवच, सानुग्रह सहाय्य मदतीची मागणीमनपाच्या जलप्रदाय विभागात कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर कोविड-१९ च्या अनुषंगाने राज्य शासनाने अशा कर्मचाºयांना विमा कवच व सानुग्रह अनुदानाची मदत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्या धर्तीवर महापालिका प्रशासनाने मदत देण्यासोबतच मनपाच्या स्तरावर १५ लाख रुपयांची मदतही देण्याची मागणी युनियनच्यावतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका