शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ‘यूपीएससी’चे विद्यार्थी घडविण्यावर भर; आयआरएस समीर वानखेडे, कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

By रवी दामोदर | Updated: October 21, 2023 19:13 IST

विदर्भात अतिशय हुशार विद्यार्थी असून, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते युपीएससीमध्ये यशस्वी होऊ शकतात.

अकोला : विदर्भात अतिशय हुशार विद्यार्थी असून, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते युपीएससीमध्ये यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात विदर्भात खासकरून वाशिम, अकोला जिल्ह्यात यूपीएससीसाठी विद्यार्थी घडविण्यावर भर राहणार असून, त्यासाठी विविध सेमिनार घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आवश्यक पुस्तकांचा पुरवठा करणार असल्याचे मत एनसीबीचे माजी विभागीय संचालक व सध्या केंद्रीय करदाते सेवा संचालनालय चेन्नई येथे अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत समीर वानखेडे यांनी व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्टुडंट फोरम तर्फे शनिवार, दि.२१ ऑक्टोबर रोजी आयोजित यूपीएससी परीक्षा संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भातील विद्यार्थ्यांचा एमपीएससीकडे जास्त कल दिसतो, मात्र यूपीएससी ची तयारी काही वेगळी नसून दोन्हीही परीक्षेची प्रक्रिया सारखीच आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते यशस्वि होऊ शकतात, असा आशावादही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. याप्रसंगी स्टुडंट फोरमचे अध्यक्ष डॉ. शिरीष तराळे, विकास पवार, रोहित पाटील, आचल राजपूत आदी उपस्थित होते.

अशोक वाटीकेत केले अभिवादन!आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी सकाळी शहरातील अशोक वाटिका येथे तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बुद्धवंदना घेतली. राजकारण नव्हे, तर अकोला माझे घर मी येत राहणार!गेल्या काही दिवसांपासून समिर वानखडे यांचे अकोला, वाशिम जिल्ह्यात दौरे वाढल्याचे पहावयास मिळत आहे. यासंदर्भात राजकारणात सक्रीय होणार का, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर वानखडे यांनी अकोला माझे घर असून, कौलखेड परिसरात माझे बालपण गेले आहे. आता अठरा वर्षे सर्व्हिस झाली असून, समाजाचं काही देणं आहे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे अकोल्यात येत राहणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

टॅग्स :AkolaअकोलाSameer Wankhedeसमीर वानखेडे