शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

By admin | Updated: September 28, 2015 02:26 IST

अवघे विघ्ने नेसी विलया..बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात अकोल्यात गणेशभक्तांनी बाप्पांना दिला निरोप.

अकोला : लाडक्या गणरायाच्या आगमनाने सर्वच भाविक सुखावून गेले होते. सतत दहा दिवस घरोघरी, मंडळांमध्ये बाप्पाची सरबराई सुरू होती. जणू एक प्रकारचा आनंदोत्सवच सुरू होता. रविवारी बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. तेव्हा, भक्तीने ओतप्रोत झालेले मन भरून येत होते.. जड अंत:करणाने भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते.. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या..आणि आमची अवघी विघ्ने दूर करून पुन्हा या, अशी अपेक्षा व्यक्त करीत भाविकांनी बाप्पाचा निरोप घेतला. म् िगत दहा दिवसांपासून भक्तांच्या सान्निध्यात असलेल्या बाप्पाला रविवारी वाजतगाजत निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीला मानाचा बाराभाईच्या गणपती पूजनाने जयहिंद चौकातून सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. मिरवणुकीमध्ये पहिल्या स्थानी मानाचा बारभाई गणपती, द्वितीय स्थानावर राजराजेश्‍वर मंडळाचा गणपती, त्यानंतर जागेश्‍वर गणेश मंडळ, खोलेश्‍वर गणेश मंडळ, प्रगती गणेशोत्सव मंडळ, वीर हनुमान गणेश मंडळ, श्री नवयुवक गणेशोत्सव मंडळ रतनलाल प्लॉट, श्री गणेशोत्सव मंडळ, रजपूतपुरा आदी मंडळांसह शहरातील २८ प्रमुख मंडळे सहभागी झाली होती. मानाचा बारभाई गणेशाचे खासदार संजय धोत्रे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, महापौर उज्ज्वला देशमुख यांनी पूजन केले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त अजय लहाने, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, माजी महापौर सुमन गावंडे, मदन भरगड, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष मोतीसिंह मोहता, महासचिव सिद्धार्थ शर्मा, विजय जयपिल्ले, अँड. सुभाषसिंह ठाकूर, नीरज शाह उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबतच शहरात हजारो घरांमध्ये आस्थेने स्थापना करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन गणेश घाटावर भाविकांनी केले. मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर मानाच्या गणपती मंडळांच्या पाठोपाठ येणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जयहिंद चौकात क्रमांक देण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीकडे मिरवणुकीत सहभागी झालेल्या १७ मंडळांसह ५ आखाड्यांची अधिकृत नोंदणी होती. काही मंडळांनी नोंदणी न करताच मिरवणुकीत सहभाग घेतल्याने प्रत्यक्षात मंडळांची संख्या त्यापेक्षा अधिक झाली. पहिल्या गणेशाचे विसर्जन सायंकाळी ६.१0 वाजता झाले.