शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

अकरा मुले पाण्यात अडकल्याची अफवा अन शोध पथकाची धावाधाव !

By admin | Updated: August 4, 2016 01:34 IST

सोशल मीडियावरचा सैराटपणा : खात्री करूनच माहिती देण्याची गरज.

अकोला, दि. ३: कानशिवणी ते बोरगावमंजू रोडवर अन्वी मिर्झापूर फाट्यानजीकच्या नाल्याच्या पुरात ११ विद्यार्थी अडकल्याचा निरोप व्हॉट्स अँपच्या माध्यमातून फिरला अन् या निरोपावरून पिंजरच्या संत गाडगेबाबा शोध पथकाने तत्काळ धाव घेत घटनास्थळ गाठले. प्रशासनही तत्परतेने हलले. नायब तहसीलदारासह तलाठीही हातचे काम सोडून त्या ठिकाणी धाव घेते झाले. परिसरातील नागरिकही नाल्याकडे निघाले; पण..तिथे गेल्यावर असा कुठलाच प्रकार नसल्याचे समोर आल्यावर सर्वांंनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला; मात्र अशी खोटी माहिती देऊन आपत्कालीन स्थितीमध्ये जीव वाचविणार्‍या पथकाला धावाधाव करण्यास भाग पाडणारे असे प्रकार भविष्यात होता कामा नये, हा धडा या निमित्ताने जनतेने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वात जलद संपर्कासाठी आता व्हॉट्स अँपचा वापर सर्वाधिक वाढला आहे. या मसेज अँप्लिकेशनच्या माध्यमातून आलेल्या संदेशाची कुठलीही खातरजमा न करता हा मॅसेज पुढे फारवर्ड करण्याच्या वृत्तीमुळे अनेकांसामोर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.बुधवारी संध्याकाळी मुले पाण्यात अडकल्याचा असाच मॅसेज संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाला मिळाला व पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपल्या चमूसह तत्काळ अन्वी मिर्झापूरकडे धाव घेतली. या प्रवासादरम्यान सुकडीच्या नाल्यावरील पुलावरून दोन फूट पाणी होते; मात्र या पथकाने मुलांच्या जिवाची काळजी करीत पुलावरून गाडी टाकली. अन्वी मिर्झापूर जवळच्या नाल्यावर पोहचल्यावर तेथे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या निर्देशावरून नायब तहसीलदार महेंद्र अत्राम हेसुद्धा तत्काळ तेथे पोहचले; मात्र त्या ठिकाणी असा कुठलाही प्रकार आढळून आला नाही व कुणीतरी चुकीची माहिती प्रसारित केल्याचे समोर आल्याने सार्‍यांनीच रोष व्यक्त केला. असा प्रकार भविष्यात घडत गेल्यास महत्त्वाच्या प्रसंगात तत्काळ मदत होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे अशा अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे.