अकोला - हत्तीरोग हा डासांमुळे पसरणारा आजार असून, या आजाराच्या एकाही नवीन रुग्णाची नोंद जिल्हय़ात झाली नसल्याने यावर्षी ही मोहीम जिल्हय़ात राबविण्यात आली नाही. अकोला जिल्हय़ातील बाश्रीटाकळी व पातूर तालुक्यात हत्तीरोगाचे काही रुग्ण असल्याने सतत तीन वर्ष हत्तीरोग दुरीकरण मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, या वर्षी नवीन रुग्णांची नोंद नसल्याने ही मोहीम राबविण्यात आली नाही. यावरून हत्तीरोग जिल्हय़ातून हद्दपार झाल्याची माहिती आहे. राज्यातील १४ जिल्हय़ातील हत्तीरोगप्रवण भागात एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हय़ात मागील वर्षभराच्या कालावधीत एकही रुग्ण आढळून न आल्याने एक दिवसीय औषधोपचार वाटप मोहिमेला यश आले असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
हत्तीरोग हद्दपार होतोय!
By admin | Updated: September 10, 2014 01:32 IST