शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरीचा भुर्दंड सामान्य ग्राहकांना!

By admin | Updated: May 19, 2017 01:39 IST

फॉल्टी मीटरच्या नावाखाली दिले जाते ज्यादा देयक

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण वाढले असून, त्याचा भुर्दंड सर्वसामान्यांना बसत असल्याचे चित्र आहे. या वीज चोरीची तूट भरून काढण्यासाठी अनेकांना फॉल्टी मीटर दाखवून अव्वाच्या सव्वा बिले देण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. ही वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना करणे अपेक्षित आहे; मात्र वीज वितरण कंपनीने उपाययोजना न करता त्याची तूट सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूल करण्याचा सपाटा लावला आहे. अनेकांना फॉल्टी बिले देऊन मोठ्या प्रमाणात देयक देण्यात येत आहेत. याविषयी तक्रार केल्यास ग्राहकाची समजूत काढून काही प्रमाणात देयक कमी करण्यात येते व उर्वरित देयक टप्प्याटप्प्याने ग्राहकांकडून वसूल करण्यात येत आहे. वीज चोरी पकडण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून थंडावली असून, मार्चअखेर केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी ती राबविली जाते. वीज वापर कमी व देयक जादा असा फंडा महावितरणने सुरू केल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. ज्यादा देयक येत असल्याच्या तक्रारी वीज वितरणच्या कार्यालयात धूळ खात पडून आहेत. अखेर कंटाळलेल्या ग्राहकांना नाइलाजाने ज्यादा आलेले देयक भरावे लागत आहे. राज्याचे ऊर्जामंत्री अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ज्यादा देयकांपासून त्यांनी सर्वसामान्यांची सुटका करावी, अशी अपेक्षा आहे. महावितरणने अशी लढविली शक्कल !- घरगुती वीज वापरामुळे येणारी युनिटची संख्या लक्षात घेता जर अतिरिक्त वीज वापर रोहित्राजवळ बसविलेले मीटरयंत्र दाखवित असेल, तर वीज चोरीचा प्रकार सुरू असल्याचे लक्षात येते. - वीज ग्राहकांच्या मीटर रिडिंगच्या युनिटच्या संख्येपेक्षा अधिभार असल्यास शहानिशा न करताच अनेक ग्राहकांना फॉल्टी मीटर नोंद करून ज्यादा बिल देण्यात येते. जेणेकरून वापरलेले योग्य युनिट संख्या व वीज चोरीची युनिट संख्या यांचा ताळमेळ बसेल. - तर अनेक ठिकाणी कृषी पंपांचा विद्युत पुरवठा बंद असल्यास गावठान फिडरवरून तो पुरवठा जोडल्या जातो. त्याचा अधिभारही सामान्य ग्राहकांवर लावण्यात येतो.